शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पुरवणी परीक्षांचे निकालात नागपूर विभागात दहावीत ४३, बारावीत ४४ टक्के उत्तीर्ण

By निशांत वानखेडे | Updated: July 29, 2025 17:55 IST

पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर : मुलींपेक्षा मुलांचे यश अधिक

नागपूर : राज्य शिक्षण मंडळातर्फे जुन-जुैल काळात घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले. यात नागपूर विभागाने समाधानकारक कामगिरी केली आहे. विभागातून दहावीच्या ४३.६६ टक्के आणि बारावीतील ४४.७९ टक्के विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. या उत्तीर्णांचा याचवर्षी अकरावी प्रवेशाचा मार्ग माेकळा झाला आहे. विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेमध्ये मुलींपेक्षा मुले व बारावीत मुलांपेक्षा मुलींना अधिक यश मिळविले आहे.

नागपूर विभागात दहावीच्या पुरवणी परीक्षेत नाेंदणी केलेल्या ४,७१५ पैकी ४,६२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २०१८ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. यामध्ये १२६४ मुले आणि ७५४ मुली उत्तीर्ण झाल्या. गडचिराेली जिल्ह्यातील एकमेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आहे. ५ विद्यार्थी प्रथम श्रेणी आणि ८९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले. पुरवणी परीक्षेत गाेंदिया जिल्ह्यात सर्वाेत्तम (७८.०९) कामगिरी केली, तर नागपूर जिल्हा सर्वात खाली (२७.०१) राहिला.

बारावीच्या परीक्षेत नाेंदणी केलेल्या ८,२७३ पैकी ८,११७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापाैकी ३,६३६ विद्यार्थी (४४.७९ टक्के) उत्तीर्ण झाले. यामध्ये परीक्षा देणाऱ्या २९७० मुलींपैकी १४२९ (४८.११ टक्के) मुली यशस्वी झाल्या, तर ५,१४७ मुलांपैकी २२०७ (४२.८७ टक्के) मुले यशस्वी ठरले. बारावीत पुरवणी परीक्षा देणारे १४५ विद्यार्थी गुणवत्तेत उत्तीर्ण झाले, तर ५११ प्रथम श्रेणी व ६२२ द्वितीय श्रेणीत पास झाले.

दहावीत गाेंदिया सर्वाेत्तम, नागपूर सर्वात खालीजिल्हा            परीक्षार्थी   उत्तीर्ण झाले     टक्केगाेंदिया             २१०           १६४           ७८.०९गडचिराेली        ६९३          ३८१            ५४.९७चंद्रपूर              १०३९         ५४९            ५२.८३भंडारा              ६५१           ३०७            ४७.१५वर्धा                  ६६७         २४९             ३७.३३नागपूर             १३६२         ३६८             २७.०१

बारावीत विज्ञान शाखेचा निकाल सर्वाेत्तमशाखा      परीक्षार्थी     उत्तीर्ण      टक्केविज्ञान      २७४५        १९६३     ७१.५१कला        ३९५४        १२४८      ३१.५६वाणिज्य   १०२५         ३०८         ३०.०४व्हाेकेशनल  ३५८        १०१          २८.२१

अकरावी प्रवेशाचा मार्ग माेकळाफेब्रुवारी-मार्चच्या परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये म्हणून जुन-जुलैच्या काळात पुरवणी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेचा विद्यार्थ्यांना लाभ झाला. त्यामुळे दहावीतील २०१८ विद्यार्थी आता अकरावीत प्रवेश घेऊ शकतील. नागपूर जिल्ह्यातील ३६८ विद्यार्थ्यांची अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत भर पडेल. दुसरीकडे बारावीचे ३६३६ विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतील.

टॅग्स :nagpurनागपूरexamपरीक्षाEducationशिक्षण