शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातून परतलेल्या सुनिताच्या मोबाइलमध्ये आढळले दोन संशयित पाकिस्तानी ॲप्स

By योगेश पांडे | Updated: June 4, 2025 23:39 IST

फॉरेन्सिक विश्लेषण सुरू : एनआयएच्या पथकाने मागविले प्रकरणाचे सगळे तपशील

योगेश पांडे 

नागपूर : एलओसी ओलांडून पाकिस्तानात जाणाऱ्या सुनिता या महिलेच्या मोबाइलच्या तपासणीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. तिच्या मोबाइलमधून दोन संशयास्पद पाकिस्तानी ॲप्स आढळल्या आहेत. सुनिता काही दिवस पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात होती. त्यामुळे त्या ॲप्स पाकिस्तानी एजन्सीजने इन्स्टॉल केले का, याची सखोल फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

सुनिता १४ मे रोजी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत घुसली. ती गिलगिटमध्ये पाकिस्तानी नागरिक झुल्फिकारला भेटणार होती. याआधी तिला पाकिस्तानी रेंजर्सनी पकडले होते. चौकशीनंतर तिला बीएसएफच्या ताब्यात देण्यात आले. बीएसएफने तिला अमृतसर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पोलिस कोठडी संपल्यानंतर तिला कारागृहात पाठविण्यात आले होते. पोलिसांनी तिच्या मोबाइलची सायबर तज्ज्ञांकडून तपासणी केली. त्यात प्राथमिकदृष्ट्या तर कुठले मालवेअर आढळले नाही. मात्र, दोन पाकिस्तानी ॲप्स मात्र आढळले. सायबर तज्ज्ञांनी तिचे चॅट्स रिकव्हर केले आहेत. त्यात तिने काही पाकिस्तानी नागरिकांसोबत जेमस्टोनच्या व्यवसायाचा मुद्दा काढून बोलणे सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यानंतर चॅटिंगची दिशा भलत्याच दिशेने गेल्याचे दिसून आले, अशी माहिती पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली. एनआयएच्या मुंबई पथकाने नागपूर पोलिसांशी संपर्क केला असून, काही प्रश्नांची यादी पाठविली आहे. या एकूण प्रकरणाची माहिती घेतल्यावर यात दहशतवादी ॲंगल आहे का, हे ठरवून त्यांचे विशेष पथक नागपुरात चौकशीसाठी येईल.

स्थानिक नागरिकाने दिली होती ‘लिफ्ट’सुनिता तिच्या मुलासोबत श्रीनगरवरून कारगिलला गेली होती. तिला एका स्थानिक व्यक्तीने लिफ्ट दिल्याची माहिती समोर आली. तिच्या मुलानेदेखील याला दुजोरा दिला आहे. संबंधित स्थानिक व्यक्तीला कारगिल पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येणार आहे. दरम्यान, कारगिल पोलिसांचे पथक मंगळवारी नागपूरला पोहोचले. तेथील स्थानिक विशेष ॲक्टनुसार कारगिल पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारगिल पोलिसांच्या पथकाने प्राथमिक चौकशी केली व त्यांना तिची कस्टडी हवी आहे. त्यांनी न्यायालयात प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज केला. प्रोडक्शन वॉरंट मिळाल्यानंतर, सुनिताला चौकशीसाठी कारगिलला नेले जाईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत