शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टिप्परच्या धडकेत ढाब्यावरील मुक असलेला वेटर जागीच ठार; चालकास अटक 

By दयानंद पाईकराव | Updated: May 28, 2024 17:08 IST

रस्ता ओलांडताना दिली धडक.

दयानंद पाईकराव,नागपूर : ढाब्यावर मागील तीन वर्षांपासून वेटरचे काम करीत असलेल्या आणि मुक असलेल्या ५० वर्षाच्या वेटरला भरधाव टिप्परने धडक दिल्यामुळे त्याला जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी २७ मे रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास पारडी पोलिस ठाण्यांतर्गत घडली असून पोलिसांनी आरोपी टिप्पर चालकास अटक केली आहे.

रामु (५०) असे मृत्यू झालेल्या वेटरचे नाव आहे. तर गणेश उर्फ बादल महादेव उके (२४, रा. गोवरी ता. मौदा, जि. नागपूर) असे आरोपी टिप्पर चालकाचे नाव आहे. पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोशन हरिभाऊ गजभिये (४०, रा. वॉर्ड क्र. २, कापसी बुजुर्ग) हे उमीया वसाहतकडे जाणाऱ्या रोडवर पारडी येथे रोशन ढाबा चालवितात. त्यांच्या ढाब्यावर रामु हा मागील तिन वर्षांपासून काम करून तेथेच राहत होता. तो मुका असल्यामुळे त्याचा मुळ पत्ता कोणालाच माहित नव्हता. सोमवारी २७ मे रोजी रात्री १० वाजता रामु रस्त्याच्या पलिकडे असलेल्या कामाचा ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट समोरून आपण काम करीत असलेल्या ढाब्याकडे परत येत होता.

दरम्यान, भंडाराकडे जाणाऱ्या टिप्पर क्रमांक एम. एच. ४०, बी. एल-९६८८ चा चालक गणेशने आपल्या ताब्यातील टिप्पर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून रामुला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषिक केले. या प्रकरणी रोशन गजभिये यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपी टिप्पर चालक गणेश उके यास अटक करून तपास सुरु केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघात