शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

दात पाडणाऱ्या आरोपीचा कारावास घटला

By admin | Updated: December 21, 2015 03:14 IST

हल्ला करून एकाचा दात पाडल्याप्रकरणी उमरेडच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या निकालाविरुद्ध आरोपीने दाखल केलेले अपील ..

उमरेड जेएमएफसी निकालाविरुद्धच्या अपिलास अंशत: मंजुरीनागपूर : हल्ला करून एकाचा दात पाडल्याप्रकरणी उमरेडच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या निकालाविरुद्ध आरोपीने दाखल केलेले अपील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांच्या न्यायालयाने अंशत: मंजूर केले. आरोपीच्या कारावासाच्या शिक्षेत सहा महिन्याने घट केली. दहा हजार रुपयांचा दंड मात्र कायम ठेवला. सचिन बंडू सोनडवले असे आरोपीचे नाव असून, तो उमरेड रेल्वे स्थानकनजीकच्या स्लम एरियातील रहिवासी आहे. या आरोपीला उमरेडच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाने (जेएमएफसी) १७ एप्रिल २०१३ रोजी एक वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती, तर अन्य ११ आरोपींची निर्दोष सुटका केली होती. या शिक्षेविरुद्ध सचिन सोनडवले याने सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. प्रकरण असे, १२ डिसेंबर २००८ रोजी सूरज सखाराम मांडले याला मुलगा झाल्याने सूरज, त्याचे नातेवाईक आणि मित्र मोहल्ल्यात आनंद उत्सव साजरा करीत होते. नाचगाणेही सुरू करण्यात आले होते. आरोपी सचिन सोनडवले आणि त्याचे मित्र नाचगाण्याच्या कार्यक्रमाजवळून जात असताना त्यांनी शिवीगाळ करीत नाचण्यास मनाई केली होती. या प्रकाराने मोठे भांडण उद्भवून सोनडवले आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला करून तिघांना जखमी केले होते. सूरजच्या तोंडावर जड वस्तूने मारून तोंड फोडले होते आणि समोरचा एक दात पाडला होता. सूरजची आई शांताबाई हिच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी भादंविच्या १४७, १४८, १४९, ३२५, ३२३, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. याबाबतचा खटला उमरेडच्या जेएमएफसी न्यायालयात चालून सचिनला शिक्षा सुनावण्यात आली होती, तर उर्वरित आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली होती. सचिन सोनडवले याने या शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. या न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सहा महिन्याच्या कारावासात परिवर्तीत करून दंडाची शिक्षा कायम ठेवली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील लीलाधर शेंदरे यांनी तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. आय.जी. मेश्राम यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)