शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'हिंदू तनमन हिंदू जीवन'चे प्रभावी सादरीकरण; वादन आणि नृत्याचा त्रिवेणी संगम

By जितेंद्र ढवळे | Updated: August 30, 2023 13:53 IST

 ‘तिरंगायन’मध्ये प्रेक्षकांनी अनुभवला गायन

नागपूर : दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची अविस्मरणीय हिंदी कविता ‘हिंदू तनमन हिंदू जीवन’च्या कवी डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या गीतावरील नृत्याने प्रेक्षकांना देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत केले.

राज्य सांस्कृतिक विभाग व अमृत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वीर शहिदांना अभिवादन आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देणारा 'तिरंगायन' हा कार्यक्रम डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, विकास कुंभारे तसेच, परिणय फुके, मिलिंद माने, संजय भेंडे, बंटी कुकडे, जयप्रकाश गुप्ता, अरविंद गजभिये, सुधाकर कोहळे, संगीतकार मोरेश्वर निस्ताने आणि अमृत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिवाकर निस्ताने ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.

अमृत प्रतिष्ठान, नागपूर निर्मित या प्रेरणादायी देशभक्ती गीतांच्या कार्यक्रमाला मोरेश्वर निस्ताने यांचे उत्तम संगीत लाभले. संगीत संयोजन महेंद्र ढोले यांचे होते. विविध गीतांवर अवंती काटे व सचिन डोंगरे यांच्या चमूने अप्रतिम नृत्य सादर केले.

भारत माता की जय, वंदे मातरम् चा जयघोष यावेळी करण्यात आला. मुकुल पांडे, अमर कुळकर्णी, अंकिता टीकेकर, मोरेश्वर निस्ताने या गायकांनी ‘जंहा डाल डाल पर’, ‘ऐ मेरे प्यारे वतन’, ‘म्यानातून उसळे’, ‘युगांतर’, ‘तुझे सूरज कहू’, ‘कर चले हम फिदा’, ‘ने मजसीने’ आदी गीते उत्कृष्टरीत्या सादर केले. दिवाकर निस्ताने यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकdanceनृत्यnagpurनागपूरHinduहिंदू