शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे वाढले गुरुजी व शाळेचे महत्त्व.....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 22:23 IST

 शाळा नसली, गुरुजी नसले तरी घरगुती तंत्रज्ञानाचा वापर करून मुलं ही शिकू शकतात अशी मानसिकता पालकांची बनलेली दिसत होती. परंतु कोविड १९ च्या संकटामुळे शाळा लॉक झाल्या व हळूहळू ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेला महत्त्व आले.

नागपूर: अलीकडच्या काळामध्ये विविध साधने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगतीने ज्ञानार्जन करणे सोयीचे वाटत असल्याने गुरुजी व शाळेचे महत्त्व पालकांच्या मनात कमी होताना दिसत होते . शाळा नसली, गुरुजी नसले तरी घरगुती तंत्रज्ञानाचा वापर करून मुलं ही शिकू शकतात अशी मानसिकता पालकांची बनलेली दिसत होती. परंतु कोविड १९ च्या संकटामुळे शाळा लॉक झाल्या व हळूहळू ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेला महत्त्व आले.

परंतु शाळा असली की, कुटुंबासह विद्यार्थ्याची दिनचर्या एका बंधनात असते. विद्यार्थी भल्या पहाटेपासून शाळेच्या तयारीसाठी लवकर उठतो, शाळेची तयारी करुन दिलेला गृहपाठ, स्वाध्याय वेळच्या वेळी सोडवतो, वेळेवर जेवण करतो, शाळेत सकाळी ११ ते ५ दरम्यान शिक्षक व मित्रांना भेटल्याने वेगळ्या प्रकारची उर्जा निर्माण होऊन परिपाठापासून ते दिवसभर सर्वांशी समायोजन साधून खेळ, क्रीडा, गप्पा, गाणीगोष्टी, वाचन, लेखन, पाठांतर, कृती यांच्यासह दहा नैतिक मूल्यांप्रमाणे वागण्याचाबोलण्याचा प्रयत्न करतो. परिपाठातील राष्ट्रगीत, प्रार्थना, संविधान, बातम्या, दिनांक, वार, दिनविशेष, सुविचार, चिंतन, मनन, मौन आदींमुळे एक स्वतंत्र जीवनशैली निर्माण होते.

या सर्व जीवनशैलीपासून पाल्य वंचित राहिल्याने विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. मुले ऑनलाईन अभ्यास करताकरता इतर मार्गाला लागण्याबरोबरच स्वमग्न व विविध आजाराने ग्रस्त होण्याबरोबरच अभ्यासाचा कंटाळा करू लागली आहेत. लेखन व गणिती क्रिया करण्याचे विसरल्यागत वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागामध्ये तर पालकांचे ऑनलाईन शिक्षणाला सहकार्य मिळत नाही.

लॉकडाऊन काळात आमची मुले अभ्यास करत नाहीत. ऑनलाईन व्हिडिओ पाहत नाहीत. आम्हालाही त्यांना वेळ देता येत नाही. शेतीची कामे, मजुरीची कामे आहेत. मोबाईल घेऊन जावे लागते. रिचार्ज नाही मुले अभ्यास करत नाही. चिडचिड करतात दंगामस्ती करत आहेत, त्रास देत आहेत, यामुळे आम्ही फार त्रस्त झालो गुरुजी, शाळा केव्हा चालू होते? अशी वाक्ये एरव्ही शाळेकडे ढुंकुनही न पाहणाऱ्या पालकांच्या तोंडून ऐकू येत आहेत. एकच पालक नाही तर, असे अनेक पालक या विषयी चिंताग्रस्त दिसत आहेत. ऑनलाईन शिक्षणाला महत्त्व नाही. तर शाळा केव्हा सुरू होत आहे. अशी वारंवार विचारणा करताना पालक दिसत आहेत.

शहरी असो वा ग्रामीण सगळ्यांनाच कळून चुकले की गुरुजीविना किंवा शाळेविना मुलांचे ज्ञानार्जन तसेच शारिरीक, भावनिक व मानसिक विकास साधणे फार अवघड होत आहे.

पूर्वी गुरुकुल पद्धतीने ऑफलाइन शिक्षणालाच महत्त्व प्राप्त झाले होते व आजही ते कायमच आहे. ऑफलाइनला पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया ही असली पाहिजे पण ऑनलाईनने परिपूर्णता येणारच नाही हे यातून लक्षात येते. गेल्या दिड वर्षापासून शाळा बंद असल्याने कोरोनामुळे का होईना ग्रामीण भागातील विद्यामंदीर व गुरुजनांना अच्छे दिन येत आहेत.गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णु: गुरुदेर्वो महेश्वर: । गुरु: साक्षात परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: हे खरे ठरताना दिसत आहे.

साहेबराव आ.राठोडजि.प.प्राथ.शाळा,वडसद तांडा पं.स.पुसद जि.यवतमाळ

 

टॅग्स :Schoolशाळा