शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या वाटाण्यावर आयात शुल्क २० हजार रुपये क्विंटल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:38 IST

पांढऱ्या वाटाण्यावर प्रति क्विंटल २० हजार रुपये आयात शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने देशात वाटाण्यासह या वाटाण्यापासून तयार होणारे बेसनही महाग होणार आहे.

ठळक मुद्दे वाटाण्याचे बेसन होणार महाग : स्वदेशी वाटाण्यावर भिस्त

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यानंतर सरकारने एखाद्या शेतकी उत्पादनावर चारपट आयात शुल्क आकारण्याची पहिलीच वेळ आहे. पांढऱ्या वाटाण्यावर प्रति क्विंटल २० हजार रुपये आयात शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने देशात वाटाण्यासह या वाटाण्यापासून तयार होणारे बेसनही महाग होणार आहे.होलसेल धान्य बाजाराचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले की, पूर्वी पांढरे वाटाणे स्वस्तात कॅनडा येथून आयात व्हायचे. ते २५०० आणि ३ हजार रुपये विकले जायचे. त्याच्या डाळीचे दर ३५०० ते ३८०० रुपये होते. तीन वर्षांपूर्वी सर्वच डाळीचे दर १०० रुपयांवर पोहोचल्यानंतरही वाटाणा डाळीचे भाव ३५ ते ४० रुपये किलो होते. चणा डाळीचे भाव जास्त असल्यामुळे वाटाणा डाळीचे बेसन लोकप्रिय आणि स्वस्त होते. चणा डाळीच्या बेसनमध्ये वाटाणा डाळीचे मिश्रण करण्यात येत होते. चणा डाळीचे भाव कमी झाल्यानंतरही ग्रामीण भागात वाटाणा डाळीला लोकांची पसंती होती.आता सरकारने वाटाणा आयातीचे नियम कठोर केले आहे. ५० टक्के ड्युटीसह २० हजार रुपये प्रति क्विंटल किमान आयात शुल्क केले आहे. सर्व खर्चासह वाटाणाची आयात पोर्टवर ३० हजार रुपये क्विंटल होईल आणि ग्राहकांपर्यंत येईपर्यंत भाव ३५ ते ४० हजारपर्यंत जाणार आहे. ही सरकारची अतिशयोक्ती आहे. आता देशात पांढऱ्या  वाटाण्याची आयात अशक्य आहे. त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे. आता लोकांना स्वदेशी निर्मित वाटाण्यावर अवलंबून राहावे लागेल.मोटवानी म्हणाले, देशात यावर्षी वाटाण्याचे पीक ९ लाख हेक्टरवर आहे. सरकारच्या अधिसूचनेनंतर एकाच दिवसात वाटाण्याच्या किमतीत २० टक्के वाढ होऊन भाव ७ हजारांवर पोहोचले आहेत. पूर्वी चण्यापेक्षा वाटाण्याचे भाव प्रति क्विंटल ५०० ते ७०० रुपये कमी असायचे. पण आता ठोकमध्ये चणे ४५०० ते ४६०० रुपये क्विंटल असून वाटाण्यापेक्षा १५०० ते १७०० रुपये कमी आहेत. वाटाण्याचे भाव वाढल्याने चण्याचे भावही वाढले आहेत.

टॅग्स :Inflationमहागाईnagpurनागपूर