शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
2
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
3
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
4
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
5
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
7
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
8
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
9
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
10
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
11
भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
12
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
13
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
14
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
15
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
16
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
17
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
18
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
19
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
20
दोन डबे साेडून एक्स्प्रेस धावली, दोनदा तुटले कपलिंग; ४० मिनिटे वाहतूक ठप्प, प्रवाशांमध्ये घबराट

रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या रानभाज्या झाल्या दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 13:22 IST

महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या रानभाज्या वर्षानुवर्षेपासून लोकांच्या आहाराचा भाग राहिल्या आहेत; मात्र आरोग्यदायी असूनही दुर्लक्षामुळे त्या नामशेष होत आहेत.

ठळक मुद्देकोरानाच्या संकटात संवर्धनाची गरजराज्यात १०४ प्रजातींची नोंद

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ चा विळखा रोखणारी औषधी सध्यातरी उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, हाच सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. अशावेळी ही प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या रानभाज्या वर्षानुवर्षेपासून लोकांच्या आहाराचा भाग राहिल्या आहेत; मात्र आरोग्यदायी असूनही दुर्लक्षामुळे त्या नामशेष होत आहेत. कोरोनाच्या निमित्ताने का होईना, या रानभाज्यांच्या संवर्धनाकडे लक्ष वेधले आहे.

पावसाळा आला की रानावनात, शेतात अनेक प्रकारच्या भाज्या फुलायला लागतात. तरोटा, पातूर, शेपू, रानमेथी किंवा फळ प्रकारातील काटवेल या लोकप्रिय भाज्या. केवळ जंगलात मिळणारे काटवेल खायला चवदार आणि आरोग्यदायी आहेत पण दुर्मिळ असल्याने इतर भाज्यांच्या तुलनेत त्याचे दर कायम अधिकच राहिले आहेत. हायब्रीड काटवेल मिळतात पण त्यात रानातल्या काटवेलाची सर नाही, असे हमखास ऐकायला मिळते.

राज्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या लोकांच्या आहारात राहिल्या आहेत. त्यातल्या काही कॉमन तर काही विभागानुसार बदलणाºया आहेत. वनस्पतीतज्ज्ञ डॉ. नानासाहेब उगेमुगे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून रानभाज्यांचे वैशिष्ट्य लोकांसमोर आणले. त्यांच्या सर्वेक्षणानुसार, राज्यात १०४ प्रजातींच्या रानभाज्या आढळून येतात. त्यातील ७६ प्रजाती कॉमन म्हणजे सर्व जिल्ह्यात आढळून येतात. यामध्ये राजगिरा, चवळी, सुरण, सापकांदा, शतावरी, आपटा, कोंदल, काटवेल, रानतरोटा, तरोटा, काटबोर, धोपा, अंबाडी, लाल अंबाडी, उंदिरकानी, रानमेथी, शेवगा, कमळ, लाजाळू, शेपू, चिवडी, घोळ, चिंच, रानपालक या काही कॉमन रानभाज्या आहेत.

२९ प्रकारच्या रानभाज्या या वेगवेगळ्या विभागात दिसून येतात. त्यामध्ये विदर्भात ९, कोकणात ५, मराठवाड्यात ६ आणि खानदेशातील ८ प्रजातींच्या रानभाज्यांचा समावेश असल्याची माहिती डॉ. उगेमुगे यांनी दिली. विदर्भातील भाज्यांमध्ये धानभाजी, गोजिभ, हरदफरी, फासवेल, देवकांदा, झिलबुली, समुद्रशोत, कानफुटी किंवा कपाळफोडी, माक्का आणि पातूरच्या भाजीचा समावेश आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राय लोकांच्या अन्नात रानभाज्यांचा समावेश राहिला आहे. या भाज्यांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता अधिक असते. मात्र या भाज्यांच्या संवर्धनाकडे हवे तसे लक्ष देण्यात आले नाही. कोरोनाच्या निमित्ताने या भाज्यांच्या संवर्धनाचा विषय महत्त्वाचा झाला आहे.- डॉ. नानासाहेब उगेमुगे, वनस्पतीतज्ज्ञ

 

टॅग्स :vegetableभाज्या