शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींचे रखडलेले मानधन त्वरित द्या, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत मागणी

By पोपट केशव पवार | Updated: December 21, 2024 12:28 IST

कोल्हापूर : राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पैलवानांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडले आहे. हे मानधन सरकारने त्वरित द्यावे अशी ...

कोल्हापूर : राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पैलवानांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडले आहे. हे मानधन सरकारने त्वरित द्यावे अशी मागणी सांगोला (जि.सोलापूर) येथील आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी शनिवारी विधानसभेत केली. 'हिंद केसरींचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले' या मथळ्याखाली लोकमतने १२ ऑक्टोबरला वृत्त प्रसिद्ध करुन याला वाचा फोडली होती. याची दखल घेत डॉ.देशमुख यांनी आज विधानसभेत याकडे लक्ष वेधले.आमदार डॉ. देशमुख म्हणाले, राज्यात सात हिंदकेसरी तर २० महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत. या पैलवानांचे सहा हजारांहून १५ हजार रुपये मानधन करण्याची घोषणा सरकारने एक वर्षापूर्वी केली होती. मात्र,   गेल्या एप्रिलपासून हे मानधन दिलेले नाही. त्यामुळे हे मानधन सरकारने त्वरित द्यावे. क्रीडाधिकारी कार्यालयात खेटे मारण्याची वेळहिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पैलवानांची कुस्ती सुटली की उतारवयात त्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक महिन्याला त्यांना सहा हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे मानधन सहा सहा महिने मिळत नसल्याने या पैलवानांना क्रीडाधिकारी कार्यालयात खेटे मारण्याची वेळ येत आहे.  मानधन रखडल्याने औषधोपचार व इतर आवश्यक गोष्टींसाठी या पैलवानांची परवड होत असल्याकडे लोकमतने लक्ष वेधले होते.  

हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी पैलवानांचे गेल्या सात-आठ महिन्यांपासून मानधन रखडल्याने उतारवयात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत लोकमतने सातत्याने आवाज उठविला आहे. आज विधानसभेत डॉ.बाबासाहेब देशमुख यांनीही आमची मागणी लावून धरली त्याबद्दल त्यांचे आभार. - दीनानाथ सिंह, हिंदकेसरी पैलवान.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनWrestlingकुस्ती