लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरेगाव भीमा हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेले मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना त्वरित अटक करण्यात यावी, तसेच महाराष्ट्रातील आंबेडकरी कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी केली.दक्षिण-पश्चिम विभागातील विविध आंबेडकरी संघटनांच्यावतीने गुरुवारी त्रिशरण चौक रामेश्वर रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांचाही सहभाग जाणवतो तेव्हा याची चौकशी करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.या धरणे आंदोलनात प्रवीण कांबळे, नानाजी ढेंगरे, सुधाकर थुल, मिलिंद डांगे, इंजि. राहुल दहिकर, डॉ. संदीप नंदेश्वर, विवेक हाडके, मूलचंद चंद्रिकापुरे, शत्रुघ्न चवरे, ताराचंद्र तागडे, विशाल वानखेडे, युवराज गवळी, मधुकर वाघमारे, सिंधू थुल, अल्का माटे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते.
एकबोटे-भिडे यांना त्वरित अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:31 IST
कोरेगाव भीमा हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेले मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना त्वरित अटक करण्यात यावी, तसेच महाराष्ट्रातील आंबेडकरी कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी केली.
एकबोटे-भिडे यांना त्वरित अटक करा
ठळक मुद्देधरणे आंदोलन : दक्षिण-पश्चिम विभागातील आंबेडकरी संघटना