शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

आय एम हिज फॅन नंबर १!

By admin | Updated: May 1, 2015 02:25 IST

हातात काँग्रेसचा मोठा झेंडा, पंजाबी धाटणीचा तिरंगी पेहराव, डोक्यावर पगडी, अनवाणी पाय अन् डोळ्यात प्रतीक्षा केवळ राहुल गांधी यांची एका झलक मिळावी याची.

योगेश पांडे  नागपूरहातात काँग्रेसचा मोठा झेंडा, पंजाबी धाटणीचा तिरंगी पेहराव, डोक्यावर पगडी, अनवाणी पाय अन् डोळ्यात प्रतीक्षा केवळ राहुल गांधी यांची एका झलक मिळावी याची. अ.भा.काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी नागपूरमार्गे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी पदयात्रेला गेले. यावेळी रविभवन येथे ते मुक्कामी असताना पहाटे ४ वाजताच्या सुमारास एक तरुण सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. दिनेश शर्मा देसी असे या तरुणाचे नाव असून जेथे जेथे राहुल गांधी यांचे काही कार्यक्रम असतात, तेथे हरयाणा येथील रहिवासी असलेला दिनेश कशाचीही पर्वा न करता मिळेल त्या साधनाने पोहोचतो. राहुल गांधी मेरे लिए सबकुछ है...उनके लिए मै किसी भी हालात में कही भी जा सकता हूं...आय एम हिज ‘डायहार्ट फॅन’ हे त्याचे बोल त्याच्या सच्चेपणाची साक्ष देत होते. राहुल दिल से सच्चे हैराहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाने मी प्रभावित आहे. सामान्य जनतेबाबत त्यांच्या मनात कळवळा आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी जास्त आपुलकी वाटते. ते मनाने फार खरे आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच मी सर्व ठिकाणी पोहोचतो. ते मला ओळखतातदेखील. ज्या वेळी ते हसून चौकशी करतात तेव्हा मनाला फार समाधान मिळते. राहुल गांधी हिरो, बाकी सब झिरो हे माझे आवडते वाक्य आहे, असे दिनेशने यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राहुल यांच्या सर्व कार्यक्रमांना दिनेश अनवाणी पायाने पोहोचतो. त्याच्या पायाला गोटे व काचा लागून जखमा झाल्या होत्या तरी मी त्यांचा आदर करतो.