शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सरस्वती शाळेच्या १३ शिक्षकांना अवैध मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:42 IST

सामाजिक कार्यकर्ते विजय गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून कामठी येथील सरस्वती शिशु मंदिर प्राथमिक शाळेच्या १३ शिक्षकांच्या नियुक्त्यांना अवैधरीत्या मान्यता प्रदान करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच, यामुळे राज्य सरकारचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात जनहित याचिका : सरकारचे तीन कोटी रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक कार्यकर्ते विजय गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून कामठी येथील सरस्वती शिशु मंदिर प्राथमिक शाळेच्या १३ शिक्षकांच्या नियुक्त्यांना अवैधरीत्या मान्यता प्रदान करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच, यामुळे राज्य सरकारचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.सरस्वती शाळेला २०१०-११ मध्ये २० टक्के अनुदान मिळाले होते. २०१४-१५ मध्ये या शाळेला १०० टक्के अनुदान देण्यात आले. २०१६ मध्ये शाळेत १८ शिक्षक कार्यरत होते. त्या शिक्षकांच्या नियुक्त्या अवैधपणे झाल्याचा आरोप होता. उपशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता आरोपात तथ्य आढळून आले. त्यामुळे त्यांनी २८ मार्च २०१६ रोजी १३ शिक्षकांच्या नियुक्त्यांची मान्यता रद्द केली. असे असताना जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांनी या शिक्षकांच्या नियुक्त्यांना मागच्या तारखेमध्ये जाऊन, म्हणजे १६ नोव्हेंबर २०१५ रोजी समान आदेशाद्वारे मान्यता प्रदान केली. तसेच, या शिक्षकांना त्यांच्या वेतनाची थकबाकी उचलण्याची अनुमती देण्यात आली. या शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत आढळून आले असतानाही कुणावरच कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर ५ जानेवारी २०१८ रोजी शिक्षण उपसंचालकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून या शिक्षकांचे वेतन तात्काळ थांबविण्यास सांगितले होते. त्या आदेशाचेदेखील पालन करण्यात आले नाही. परिणामी, आतापर्यंत सरकारचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या शिक्षकांना आताही नियमित वेतन दिले जात आहे, असे गुप्ता यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, ही याचिका प्रलंबित असेपर्यंत शिक्षकांचे वेतन थांबविण्यात यावे, शिक्षकांच्या नियुक्त्यांना अवैधपणे मान्यता प्रदान करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याला व्यक्तीश: जबाबदार धरण्यात यावे, दोषी व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.सरकार व इतरांना नोटीसउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर शालेय शिक्षण विभागाचे सचिव, शिक्षण आयुक्त, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण उपसंचालक व माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांना नोटीस बजावून ३ आॅक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अमित भाटे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTeacherशिक्षक