शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अवैध दारू विक्रेत्यांची युवकाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 22:35 IST

अवैध दारूविक्रीची पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून दारूविक्रेत्यांनी एका युवकाला बेदम मारहाण केली. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार युवकाच्या आईने रविवारी पारडी पोलिस ठाण्यात नोंदविली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध दारूविक्रीची पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून दारूविक्रेत्यांनी एका युवकाला बेदम मारहाण केली. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार युवकाच्या आईने रविवारी पारडी पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.राजू सोनीलाल सीधुरिया (रा. बिडगाव), आकाश चिंतामण मेश्राम (रा. स्वागतनगर) अशी या घटनेतील मुख्य आरोपींची नावे आहेत. भांडेवाडी, पारडी येथील रहिवासी सारिका सुभाष ठवकर (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा १६ वर्षीय मुलगा सौरभ १५ एप्रिलच्या रात्री घरगुती सामान आणायला बाजारात गेला होता. आरोपी राजू सिधुरिया, आकाश मेश्राम यांनी त्याला नागेश्वर नगरातील मंगळवार बाजारात नेले. तेथे आरोपी राजू, आकाश आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांनी सौरभला बेदम मारहाण केली. आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर सौरभ कसाबसा घरी पोहचला. त्याने ही घटना आपल्या आईला सांगितली. मारहाणीमुळे संपूर्ण ठवकर कुटुंब प्रचंड दहशतीत आले. त्यांनी याबाबत कुठे वाच्यता न करता गप्पच राहणे पसंत केले. मात्र या मारहाणीच्या घटनेची कुणकूण शेजाऱ्यांना लागल्यानंतर त्यांनी ठवकर कुटुंबातील सदस्यांना दिलासा देऊन तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रविवारी सारिका ठवकर यांनी पारडी पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी राजू , आकाश आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.आरोपींचा पारडी भागात अवैध दारूविक्रीचा व्यवसाय आहे. त्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. ही माहिती सौरभने पोलिसांना दिली, असा आरोपींना संशय होता. त्यामुळे त्यांनी त्याला मारहाण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदी