अवैध दारू वाहतूकदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:08 AM2021-04-26T04:08:43+5:302021-04-26T04:08:43+5:30

कळमेश्वर : पाेलिसांनी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गाेंडखैरी परिसरात केलेल्या कारवाईमध्ये माेहफुलाच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून ...

Illegal liquor transporter arrested | अवैध दारू वाहतूकदार अटकेत

अवैध दारू वाहतूकदार अटकेत

Next

कळमेश्वर : पाेलिसांनी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गाेंडखैरी परिसरात केलेल्या कारवाईमध्ये माेहफुलाच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून एकूण ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. २४) सायंकाळी करण्यात आली.

आशिष दिलीप मुनेश्वर (२८, रा. लावा, वाडी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. कळमेश्वर पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना गाेंडखैरी परिसरातून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी एमएच-४०/एडी-३३९७ क्रमांकाच्या माेटारसायकलने जात असलेल्या आशिष मुनेश्वरला थांबवून त्याची झडती घेतली. यात त्याच्याकडे माेहफुलाची पाच लिटर दारू आढळून आली. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून ४० हजार रुपयांची माेटारसायकल आणि एक हजार रुपयांची दारू असा एकूण ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Illegal liquor transporter arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.