शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सराफांकडून मनपाची सोने खरेदीवर अवैध एलबीटी वसुली : १०० पेक्षा जास्त शोरूमला नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 01:11 IST

सराफाने शहराच्या हद्दीबाहेरून सोने खरेदी केले तर पूर्वी ऑक्ट्रॉय, नंतर एलबीटी लागायचा. पण शहरातील ग्राहकांकडून जुने सोने खरेदी केल्यास या करांची तरतूद नव्हतीच. पुढे व्हॅट आणि स्टेट जीएसटीमध्येही अशी तरतूद नाही. शिवाय राज्यात कुठल्याही मनपा हद्दीत नाही. पण नागपूर मनपा सराफांच्या सेल्फ अ‍ॅसेसमेंटच्या आधारे शहरातील ग्राहकांकडून जुन्या सोन्याच्या खरेदीवर १ टक्का एलबीटीची आकारणी व दंड वसूल करीत आहे. यासंदर्भात सध्या १०० पेक्षा जास्त सराफांना नोटीस पाठविल्या आहेत.

ठळक मुद्दे राज्यात केवळ नागपूर मनपाकडून १ टक्का एलबीटी आकारणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सराफाने शहराच्या हद्दीबाहेरून सोने खरेदी केले तर पूर्वी ऑक्ट्रॉय, नंतर एलबीटी लागायचा. पण शहरातील ग्राहकांकडून जुने सोने खरेदी केल्यास या करांची तरतूद नव्हतीच. पुढे व्हॅट आणि स्टेट जीएसटीमध्येही अशी तरतूद नाही. शिवाय राज्यात कुठल्याही मनपा हद्दीत नाही. पण नागपूर मनपा सराफांच्या सेल्फ अ‍ॅसेसमेंटच्या आधारे शहरातील ग्राहकांकडून जुन्या सोन्याच्या खरेदीवर १ टक्का एलबीटीची आकारणी व दंड वसूल करीत आहे. यासंदर्भात सध्या १०० पेक्षा जास्त सराफांना नोटीस पाठविल्या आहेत. दररोज होणाऱ्या असेसमेंटच्या आधारे ही संख्या हजारांवर जाणार आहे. या अवैध वसुलीला सराफा असोसिएशनचा विरोध आहे.मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांना निवेदनसोने-चांदी ओळ कमेटी असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी सांगितले की, मनपाने सध्या २०१२-१३ वर्षाच्या असेसमेंटच्या आधारे सराफांना ५ हजार ते २ लाखांपर्यंत एलबीटी भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. पुढे दरवर्षीच्या असेसमेंटच्या नोटिसा येणार आहेत. पूर्वी लोकांनी सोने खरेदी सराफांकडे ऑक्ट्रॉय आणि एलबीटी भरूनच केली आहे. तसे सराफांनी सेल्फ असेसमेंटमध्ये नमूद केले आहे. त्यानंतरही मनपातर्फे करण्यात येणारी एलबीटीची वसुली अवैध आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मनपाचे पूर्वीचे आयुक्त अश्विन मुद्गल आणि सध्याचे अभिजित बांगर यांना निवेदन दिले आहे. पण त्यावर कुणीही निर्णय न घेतल्यामुळे सराफांमध्ये संभ्रम आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांना शुक्रवार, ५ जुलैला निवेदन देऊन एलबीटी वसुलीची सक्ती करू नये, अशी मागणी करण्यात येणार आहे.सोने खरेदीवेळी स्थानिक करांचा भरणारोकडे म्हणाले, सराफा व्यवसाय अन्य व्यवसायापेक्षा वेगळा आहे. सराफा शहराबाहेरून दागिने खरेदी करून विकतात किंवा जुने सोने खरेदी करून दागिने घडवितात. जुने सोने बाहेरून आयात केले नसल्यामुळे ते विकले तर त्यावर कर असायला नको. मनपाला दरवर्षी सादर करण्यात येणाऱ्या वार्षिक विवरणात सराफा बाहेरून किती सोने बोलविले आणि किती ग्राहकांना विकले, याची नोंद असते. सराफांचे वहीखाते तपासण्याचा मनपाला अधिकार आहे. ग्राहकांनी सोने खरेदी करताना स्थानिक कर भरला आहे. मग विकताना एलबीटी कसा द्यायचा, यावर प्रश्नचिन्ह आहे. अशा व्यवहारात व्हॅट आणि जीएसटीमध्ये कर आकारण्याची कुठलीही तरतूद नाही आणि पूर्वी ऑक्ट्रॉय व एलबीटीमध्येही नव्हती. मग मनपा कुठल्या आधारे कर आकारत आहे, याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी द्यावे. व्हॅट खरेदीवर नव्हे तर विक्रीवर लागायचा. जीएसटीमध्येही लागत नाही. मनपा सराफांवर कराची अनावश्यक वसुली करीत असल्याचा आरोप रोकडे यांनी केला.

राज्यात जुने सोने खरेदीवर एलबीटी नाहीचनागपूर वगळता राज्यात कोणत्याही मनपाच्या हद्दीत जुन्या सोन्यावर एलबीटी आकारण्यात येत नाही. पुणे येथे एका शोरूमची वार्षिक उलाढाल ५०० कोटींची असून त्या सराफाला एलबीटीतून वगळले आहे. तसे पत्र पुणे मनपाने त्या शोरूमच्या संचालकाला दिले आहे. हेच पत्र निवेदन देताना नागपूर मनपा आयुक्तांना देण्यात येणार आहे. यावर आयुक्तांनी तातडीने निर्णय घ्यावा, असे रोकडे यांनी सांगितले. 

टॅग्स :GoldसोनंNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका