शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात बनवाडी गावाजवळ बिनधास्त अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 10:50 IST

नागपूरपासून जवळपास २० किमी अंतरावर असलेल्या वर्धा रोडवरील बनवाडी गावाजवळ मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन केले जात आहे. विशेष म्हणजे, या अवैध उत्खनन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही.

धीरज शुक्ला।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरपासून जवळपास २० किमी अंतरावर असलेल्या वर्धा रोडवरील बनवाडी गावाजवळ मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन केले जात आहे. विशेष म्हणजे, या अवैध उत्खनन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही.बनवाडी गावाजवळील डोंगराळ भागात पोकलॅण्ड आणि जेसीबी मशीनद्वारे खोदकाम केले जात आहे. त्यामुळे, हा भाग मैदानात रूपांतरित झाला असून, या भागाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. हे कृत्य  भूखंड माफियांना कशाचीच भीती उरलेली दिसत नाही. या उत्खननात डोंगरांसोबतच शेकडो वृक्षांची नासाडी झाल्याने पर्यावरणाबाबतीत या माफियांची उदासीनता प्रकर्षाने दिसून येते. सत्यता तपासण्यासाठी ‘लोकमत’ची चमू घटनास्थळी पोहोचल्यावर प्रकरण अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. बनवाडी गाव ते नवरमारी गावापर्यंत एक कच्चा रस्ता आहे आणि हा भाग वनराजी व भूसंपदेने नटलेला आहे. सामान्यत: या मार्गावर रहदारी कमीच असते. बनवाडीपासून दोन किलोमीटर पुढे गेल्यावर डोंगरांवर मुरुम आणि दगडांसाठी खोदकाम सुरू असल्याचे नजरेस पडते. यासाठी अवैध उत्खनन करणाऱ्यांनी एक स्वतंत्र रस्ताच बनवला आहे. बनवाडी-नवरमारीच्या मार्गावर अशा प्रकारचे उत्खनन दिसून येते. मात्र, डोंगरांकडे वळल्यास मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याचे स्पष्ट होते. जेसीबी आणि पोकलॅण्डद्वारे सातत्याने खोदकाम केले जात आहे. एकापाठोपाठ अनेक डम्पर येतात आणि जाताना दिसतात. या प्रकरणामुळे शासन-प्रशासनाला कोट्यवधी रुपयांच्या राजस्वापासून अलिप्त राहावे लागल्याचेही समजून येते. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरापासून रात्रंदिवस हे अवैध उत्खनन सुरू आहे. एक डम्पर मुरुम किंवा दगडांसाठी चार हजार रुपये वसूल केले जातात. अनेक ठेकेदार इथूनच मुरुम व दगड घेऊन जात आहेत.

या प्रकरणाबाबत कोणतीच तक्रार आमच्याकडे आलेली नाही. अशी तक्रार प्राप्त होताच तात्काळ कारवाई केली जाईल.- मिलिंद बऱ्हानपूरकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी नागपूरबनवाडी, नवरमारी परिसरात अवैध उत्खनन सुरू असल्याची कोणतीही लेखी तक्रार आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. तुमच्या माध्यमातूनच अशा प्रकारचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. याबाबत कुणी तक्रार केलीच तर कारवाई नक्की करू.- मोहन टिकले, तहसीलदार, नागपूर ग्रामीण

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी