शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबात ‘व्हीआयपी’च्या नावावर अवैध प्रवेश; २९ आॅगस्टपर्यंत नवीन नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 10:24 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘व्हीआयपी’च्या नावावर दिले जाणारे अवैध प्रवेश थांबविण्यासाठी नवीन पर्यटन नियमावली तयार करून ती येत्या २९ आॅगस्टपर्यंत न्यायालयात सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी वन विभागाला दिला.

ठळक मुद्दे हायकोर्टाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘व्हीआयपी’च्या नावावर दिले जाणारे अवैध प्रवेश थांबविण्यासाठी नवीन पर्यटन नियमावली तयार करून ती येत्या २९ आॅगस्टपर्यंत न्यायालयात सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी वन विभागाला दिला.यासंदर्भात अविनाश प्रभुणे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नवीन पर्यटन नियमावली तयार करण्यासाठी गेल्या जुलैमध्ये प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) डॉ. किशोर मानकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) जी. पी. नरवणे यांचा सदस्य, विभागीय वनाधिकारी शतनिक भागवत यांचा सदस्य सचिव, वनसंवर्धन तज्ज्ञ कार्यालयाचे विभागीय वनाधिकारी मनोहर गोखले यांचा विशेष आमंत्रित सदस्य तर, याचिकाकर्ते अविनाश प्रभुणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, समितीच्या काही बैठकाही झाल्या आहेत. परंतु, अद्याप नवीन नियमावली न्यायालयात सादर करण्यात आलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने वन विभागाला फटकारून वरील आदेश दिला.प्रधान मुख्य वनसंवर्धक मुकुल त्रिवेदी यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, १० जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळात ताडोबामध्ये व्हीआयपी कोट्यातून १८७५ पर्यटकांना प्रवेश देण्यात आला. परंतु, त्यातील बहुतांश पर्यटक व्हीआयपी नव्हते, हे यादी तपासल्यानंतर न्यायालयाच्या निदर्शनास आले. सध्या ताडोबामध्ये पर्यटकांना ‘प्रवेश नियम-२०१८’ अनुसार प्रवेश दिला जातो. हे नियम एका दिवशी केवळ १२५ पर्यटकांनाच प्रवेश देण्याची अनुमती देतात. त्यापैकी १२ प्रवेश व्हीआयपी कोट्यातून देण्याचे अधिकार वन विभागाला आहेत. त्यात गोंधळ केला जातो. व्हीआयपी कोट्यातून कुणालाही आत सोडले जाते. त्यामुळे न्यायालयाने यासंदर्भात स्पष्ट नियमावली तयार करण्यास सांगितले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पHigh Courtउच्च न्यायालय