शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

उपराजधानीत मान्सूनपूर्व अभियानाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:51 PM

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. वादळी वारे आणि तुरळक पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. वादळी वाऱ्यांचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे.

ठळक मुद्देतयारीच्या नावावर वीज वितरण कंपनीचा टाइमपास

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. वादळी वारे आणि तुरळक पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. वादळी वाऱ्यांचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे. वादळी वाºयाचा तडाखा बसल्याने आता यंत्रणा जागी झाली आहे. साप्ताहिक मेंटेनन्सच्या नावावर तास तासभर वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. काम पूर्ण करण्याच्या नावावर बुधवारसोबतच इतरही दिवस वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. विभागातर्फे दावा करण्यात येत आहे की, वादळी वाºयापासून यंत्रणेला नुकसान पोहचू नये म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जनतेने वीज विभागाच्या दाव्याला मान्य करून, उकाड्यात दिवस काढले. प्रत्यक्षात मात्र विभागाने मान्सूनपूर्व तयारीच्या नावावर केवळ टाइमपास केल्याचे दिसत आहे. त्यामुळे वितरण प्रणालीला वादळी वाऱ्यांचा मारा सहन करण्यास असक्षम ठरली आहे. त्यामुळेच वादळी वारे सुरू झाल्याबरोबर वीज कंपनी होणारी हानी लक्षात घेता, वीज पुरवठा खंडित करीत आहे. मात्र याला ‘हॅण्ड ट्रिपिंग’चे नाव देऊन नुकसानीपासून बचाव करण्यासाठी पुरवठा खंडित करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर विभागाकडून असेही सांगण्यात येत आहे की, वाºयांची गती जास्त असल्याने समस्या निर्माण होत आहे. वाºयाच्या वेगाने विजेचे खांब वाकायला लागले आहे. झाडांच्या फांद्या विजेच्या तारावर पडल्याने तारा तुटत आहेत.ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की, वीज कंपन्यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या नावावर अखेर केले काय आहे. लोकमतने शहरात निर्माण झालेल्या विजेच्या संकटामुळे शहरातील विविध भागातील वीज वितरण यंत्रणेचा आढावा घेतला. यावरून स्पष्ट झाले की, महावितरण असो की एसएनडीएलच्या कर्मचाºयांनी मान्सूनपूर्व तयारीच्या नावावर केवळ टाइमपास केला आहे. दोन्ही कंपन्यांच्या क्षेत्रात विजेचे खांब व विद्युत तारा झाडांमध्ये आलेल्या आहेत. वादळामुळे झाडाच्या फांद्या तुटण्याची शक्यता आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, ट्रान्सफार्मरमध्ये असणाºया आॅईलची लेव्हलसुद्धा तपासण्यात आली नाही. काही ठिकाणचे कंडक्टर व जम्पर हलायला लागले आहे.

वीज कंपन्यांसाठी ३१ मे आली नाहीनियमानुसार ३१ मे च्या पूर्वी मान्सून पूर्वतयारी पूर्ण करणे गरजेचे आहे. परंतु अद्यापही वीज कंपन्यांसाठी ही तिथी आली नाही. जून महिन्यातही मेंटेनन्ससाठी वीज खंडित करण्यात येत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, पाऊस झाल्याने झाडाच्या फांद्या वाढतात. यासाठी काम सतत सुरू असते.

मेंटेनन्सचे टेंडर ठरलेले नाहीआश्चर्य म्हणजे मान्सून पूर्वतयारीचा वेळ गेल्यानंतरही महावितरण मेंटेनन्सचे टेंडर ठरवू शकली नाही. ठेकेदारांचे म्हणणे आहे की, टेंडरचे दर कमी असल्यामुळे आम्ही काम करू शकत नाही. यासंदर्भात ठेकेदार व व्यवस्थापनाशी झालेल्या बैठकीतूनही काहीच निष्कर्श निघालेले नाही. यावरून लक्षात येते की, मान्सूनची काय तयारी झाली आहे.

टॅग्स :electricityवीज