शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिराल तर पोलीस ठाण्यात जाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 11:36 IST

: सूचना, आवाहन आणि विनंती करूनही रिकामटेकडी मंडळी दाद देत नाही. त्यांचे विनाकारण रस्त्यावरून इकडेतिकडे फिरणे सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या रिकामटेकड्यांना आवरण्यासाठी दंडुक्याचा प्रसाद देऊन पोलीस ठाण्यात (ठाण्याच्या आवारात) बसवून ठेवण्याचा प्रयोग सुरू केला आहे.

ठळक मुद्देरिकामटेकड्यांची आता खैर नाहीदंडुकेही मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सूचना, आवाहन आणि विनंती करूनही रिकामटेकडी मंडळी दाद देत नाही. त्यांचे विनाकारण रस्त्यावरून इकडेतिकडे फिरणे सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या रिकामटेकड्यांना आवरण्यासाठी दंडुक्याचा प्रसाद देऊन पोलीस ठाण्यात (ठाण्याच्या आवारात) बसवून ठेवण्याचा प्रयोग सुरू केला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव सारखा वाढत आहे. नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ती अधिक वाढू नये म्हणून पोलीस नागरिकांना त्यांच्या घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन करीत आहेत. या आवाहनाला दाद मिळत नसल्याचे पाहून पोलिसांनी हात जोडून विनंती केली आहे. काही ठिकाणी फूल देऊन तर काही ठिकाणी चक्क हार घालून पोलिसांनी गांधीगिरी सुरू केली आहे. या माध्यमातून शहरात विनाकारण इकडे-तिकडे फिरणाऱ्याना रोखण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. गस्तीवरील पथकांच्या माध्यमातून लाऊड स्पीकरवरून कडक कारवाईचा इशारा दिला जात आहे. मात्र अजूनही रिकामटेकडे पोलिसांना दाद देत नाहीत. त्यांना कोरोना प्रादुर्भावाचा धोका अद्याप लक्षात आला नाही की काय म्हणून ते विनाकारण इकडेतिकडे फिरत आहेत. भर उन्हात इकडून तिकडे फिरणाऱ्यांमध्ये केवळ तरुण आणि प्रौढच नव्हे तर महिला आणि तरुणींचाही समावेश आहे. त्याही बिनधास्त इकडेतिकडे फिरताना आढळत आहेत. त्यामुळे या सर्वांना रोखण्यासाठी पोलिसांनी आता आपली कार्यपद्धत बदललेली आहे. आता अशा रिकामटेकड्यांना दंडुक्याचा प्रसाद देऊन त्यांची वाहने जप्त करण्यासोबतच त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याचा प्रयोग पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रयोगाचा रिकामटेकड्या मंडळीवर कसा प्रभाव पडतो, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.जरीपटक्यात हार घालून स्वागतपोलिसांच्या आवाहनाला आणि कारवाईच्या इशाऱ्याला न जुमानता रस्त्याने फिरणाऱ्या अनेकांना बुधवारी जरीपटका पोलिसांनी हार घातले. वाहनचालकांचे वाहन रस्त्याच्या बाजूला नेऊन पोलिसांनी त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांना आता तरी कोरोनाचा धोका लक्षात घ्या, अशी विनंती केली. त्यांच्या हातात चालान ठेवले आणि आताही नाही मानलात तर यापुढे कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस