शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

सन्मान होत नसेल तर मार्ग मोकळा : रामदास आठवलेंचा भाजपला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 21:49 IST

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी यांनीच देशाचे नेतृत्व करावे, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची आमची इच्छा नाही. परंतु सन्मानच होत नसेल तर राजकारणात सर्वच मार्ग मोकळे असतात, असा थेट इशारा रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेतून दिला.

ठळक मुद्देयुतीसंदर्भात २५ ला कार्यकर्त्यांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी यांनीच देशाचे नेतृत्व करावे, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची आमची इच्छा नाही. परंतु सन्मानच होत नसेल तर राजकारणात सर्वच मार्ग मोकळे असतात, असा थेट इशारा रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेतून दिला.भाजप-शिवसेनेने युतीची घोषणा केली. जागा वाटपही जाहीर केले. परंतु यात मिंत्र पक्ष असलेल्या आठवलेंच्या रिपाइंसाठी मात्र एकही जागा सोडली नाही किंवा त्यांना साधी विचारणाही केली नाही. यामुळे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कमालीचे नाराज असून त्यांनी शनिवारी पुन्हा एकदा आपला संताप जाहीरपणे व्यक्त केला. नागपुरात सुरु असलेल्या नाट्य संमेलनासाठी ते आले असता त्यांनी पत्रपरिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, भाजप-शिवसेना युती व्हावी, अशी आपली सुरुवतीपासूनच इच्छा होती. ती झाली त्याचा आनंद आहे. परंतु आम्हाला साधी विचारणाही केली नाही, हे बरोबर नाही. लोकसभेमध्ये आम्हाला किमान एक जागा मिळेल, अशी अपेक्षा होती. मी स्वत: दक्षिण-मध्य मुंबई येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. देशभरातील कार्यकर्ते व लोक मला विचारत आहेत. त्यांना काय उत्तर देणार, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी उपरोक्त इशारा दिला. शरद पवार यांची भेट घेतल्याबाबत विचारणा केली असता आठवले म्हणाले, मी शरद पवार यांची भेट घेतली नाही. भेट घ्याचीच झाली तर उघडपणे घेणार. छगन भुजबळ यांनी आपल्याला भेटण्याबाबत विचारणा केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, अनिल गोंडाणे, राजन वाघमारे, बाळू घरडे, राजू बहादुरे, विनोद थुल, सतीश तांबे आदी उपस्थित होते.पाकिस्तानसोबत आरपारची लढाई व्हावीचपाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक आहे. त्याच्याशी एकदा आरपारची लढाई झालीच पाहिजे. नितीन गडकरी यांनी पाकिस्तानाचे पाणी अडवले, त्याचे स्वागत करीत केवळ पाणीच नव्हे तर पाकिस्तानसोबतचे क्रिकेटही बंद झाले पाहिजे. सैन्य दलात आरक्षण लागू करण्यात यावे, अशी आपल्या पक्षाची मागणी आहे. दलित युवकांनीही सैन्यात भर्ती व्हावे, असे आवाहनही आठवले यांनी केले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारण