‘पॉझिटिव्ह’च्या संपर्कात आल्यास विलगीकरणात जा! महापौरांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 01:22 AM2020-08-14T01:22:26+5:302020-08-14T01:24:01+5:30

एका ठिकाणी केलेली टेस्ट निगेटिव्ह येते आणि दुसऱ्या ठिकाणी टेस्ट केली तर पॉझिटिव्ह येत असल्याने भीतीचे वातावरण तयार होते. परंतु टेस्ट निगेटिव्ह आली तरी पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास नागरिकांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी मनपा मुख्यालयात आयोजित बैठकीत केले.

If you come in contact with 'Positive', go for separation! Mayor's appeal | ‘पॉझिटिव्ह’च्या संपर्कात आल्यास विलगीकरणात जा! महापौरांचे आवाहन

‘पॉझिटिव्ह’च्या संपर्कात आल्यास विलगीकरणात जा! महापौरांचे आवाहन

Next
ठळक मुद्दे चाचणीसंदर्भातील शंकांसंदर्भात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका ठिकाणी केलेली टेस्ट निगेटिव्ह येते आणि दुसऱ्या ठिकाणी टेस्ट केली तर पॉझिटिव्ह येत असल्याने भीतीचे वातावरण तयार होते. परंतु टेस्ट निगेटिव्ह आली तरी पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास नागरिकांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी मनपा मुख्यालयात आयोजित बैठकीत केले.
यावेळी नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई उपस्थित होते. योगेंद्र सवाई म्हणाले , कोविड-१९ विषाणूचे संक्रमण झाले अथवा नाही हे तपासण्यासाठी दोन प्रकारच्या चाचण्या आहेत. एक ‘अ‍ॅन्टीजिन टेस्ट’ तर दुसरी ‘आर.टी.-पीसीआर टेस्ट. यातील अ‍ॅन्टीजिन टेस्ट ही रॅपिड टेस्ट आहे. हे स्क्रीनिंग टेक्निक आहे. प्रतिबंधित क्षेत्र, हाय रिस्क पेशंट असेल, अथवा चाचणी तातडीने करवून घ्यायची असेल तर अ‍ॅन्टीजिन टेस्ट करण्यात येते. यात ती व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर ती पॉझिटिव्हच असते. त्यानंतर मग आर.टी.-पीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही. परंतु अ‍ॅनञटीजिन टेस्टमध्ये लक्षणे असूनही व्यक्ती निगेटिव्ह आली तर त्याने आर.टी.-पीसीआर टेस्ट करणे आवश्यक आहे.
आर.टी.-पीसीआर टेस्ट ही निदानाचे निश्चितीकरण करणारी टेस्ट आहे. याला गोल्ड स्टॅण्डर्ड फ्रंटलाईन टेस्ट फॉल डायग्नोसिस आॅफ कोविड-१९ असेही म्हटले जाते. अ‍ॅन्टीजिन टेस्ट मध्ये लक्षणे असतानाही निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीने निश्चितीकरण करण्यासाठी आर.टी.-पीसीआर चाचणी करून घेणे आवश्यक आहे.

१० दिवसानंतर घरी जाण्यास अनुमती
पॉझिटिव्ह व्यक्तीच्या शरीरात पुढील ६० दिवसापर्यंत विषाणूंचे अस्तित्व असू शकेल व तो पुढेसुद्धा कधीही पॉझिटिव्ह येईल. परंतु लक्षणांच्या दोन दिवस अगोदर व लक्षणांच्या पाच दिवसानंतर असे सात दिवस व्यक्ती हा विषाणूचा संसर्ग देऊ शकेल व तद्नंतर त्याला पुढील तीन दिवसात लक्षणे नसल्यास तो विषाणूचा संसर्ग त्याच्याकडून इतरांना होऊ शकणार नाही. त्यामुळे लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींना १० दिवसानंतर घरी सोडण्याबाबतचा निर्णय भारत सरकारद्वारे घेण्यात आलेला असल्याचे सवाई यांनी सांगितले.

‘औरंगाबाद पॅटर्न’चा विचार करा
औरंगाबाद येथे गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यांची तपासणी करण्यासाठी खासगी डॉक्टरांची चमू तयार करण्यात आली आहे. त्यासाठी केवळ १० हजार रुपये आकारले जातात. असा पॅटर्न नागपुरातही राबविता येईल का, यावर विचारविनिमय करून निर्णय घेण्याचे निर्देश जोशी यांनी दिले.

फिरणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णावर कारवाई करा
गड्डीगोदाम आणि इतर काही भागात पॉझिटिव्ह आल्यानंतरही गृह विलगीकरणात असलेले रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी सामाजिक संस्थांनी केल्या आहेत. यावर तातडीने आरआरटी पथकाच्या माध्यमातून कार्यवाही करण्याचे निर्देश संदीप जोशी यांनी दिले.

Web Title: If you come in contact with 'Positive', go for separation! Mayor's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.