शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचे धान्य विकले तर रद्द होणार कार्ड : शहर पुरवठा विभाग करेल कारवाई

By आनंद डेकाटे | Updated: June 18, 2025 19:22 IST

पुरवठा विभाग गंभीर : साठेबाजांवर करडी नजर, धाडसत्र सुरू

आनंद डेकाटे, नागपूर 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशनचे धान्य लोकांकडून विकत घेऊन ते खुल्या बाजारात विकणारे धान्य तस्कर मागील काही दिवसांपासून अधिक सक्रीय झाले आहे. शहर पुरवठा विभागाने सुद्धा त्यांच्यावर कारवाईसाठी कंबर कसली असून धाडी टाकणे सुरू केले आहे. आतापर्यंत दोन ठिकाणी धाडी टाकून असे धान्य जप्त करण्यात आले आहे. पुरवठा विभागाने नागरिकांनाही खुल्या बाजारात धान्य न विकण्याचे आवाहन केले आहे. कुणी जाणीवपूर्वक रेशनचे धान्य बाहेर विकत असल्याचे आढळून आल्यास त्याचे कार्ड रद्द करण्याबाबत पुरवठा विभाग गांभीर्याने विचार करीत आहे.

पावसाळ्यात रेशनचे धान्य घेताना गरीब व गरजू लोकांना अधिक त्रास होऊ नये. म्हणून राज्य सरकारने तीन महिन्याचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेशन वाटपास सुरूवात झाली आहे. तीन महिन्यांचे रेशन एकाच वेळी मिळत असल्याने साठेबाजी करणारे धान्य तस्करही सक्रीय झाले आहेत. काहींनी तर रेशन दुकानांवरच ठाण मांडले आहे. अधिकचे धान्य असल्याने गरीबही थोड्या पैशासाठी ते धान्य देण्यास तयार होतात. याचाच फायदा घेऊन ते ग्राहकांकडून धान्य विकत घेतात आणि खुल्या बाजारात विकताहेत. वस्त्यावस्त्यांमध्ये फिरून रेशनचे धान्य विकत घेतले जात आहे.

हा प्रकार उघडकीस येताच शहर पुरवठा विभागानेही कारवाई सुरू केली. बंगाली पंजा आणि ताजनगर परिसरात धाड टाकण्यात आली. तेथून शेकडो पोते धान्य जप्त करण्यात आले. यासोबतच रेशनचे धान्य घेऊन ते जाणीवपूर्वक विकणाऱ्यांवरही विभागाची करडी नजर आहे. 

रेशनचे धान्य पोस्टीक, १२ प्रकारचे व्हिटॅमिन युक्तरेशन दुकानातील तांदूळ हे पोस्टीक आहे. त्यात आयरन, फोलीक ॲसीड, व्हीटॅमिन बी-१२,व्हिटॅमिन -ए, व्हीटॅमिन बी-१, बी-३ यासाह एकूण १२ प्रकारचे व्हिटॅमिन आहेत. त्यामुळे हे पास्टीक धान्य स्वत: वापरा ते विकू नका, असे आवाहन शहर पुरवठा विभागाने केले आहे.

तस्करी करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणाररेशन धान्याची तस्करी करणारे आणि खासगी साठेबाजी करणाऱ्यांवर पुरवठा विभागाची करड नजर आहे. कारवाई सुरूच राहणार. नागरिकांनी सुद्ध रेशनचे धान्य खुल्या बाजारात विकू नये. जाणीवपूर्व धान्य विकताना कुणी आढळून आल्यास कार्ड रद्द केले जाईल.विनोद काळे, शहर पुरवठा अधिकारी 

टॅग्स :nagpurनागपूर