शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
3
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
4
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
5
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
6
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
7
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
8
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
9
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
10
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
11
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
12
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
13
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
14
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

खुनी ओळखीचा तर नव्हता ?

By admin | Updated: September 8, 2016 02:19 IST

आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्यावर गोळीबार करणारा युवक ओळखीचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांच्या पत्रव्यवहारांना प्रतिसाद नाहीनागपूर : जगातील श्रीमंत क्रिकेट मंडळांपैकी एक असलेल्या ‘बीसीसीआय’कडून (द बोर्ड आॅफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) आयोजित क्रिकेट सामन्यांदरम्यान संरक्षणासाठी पोलीस विभागाची मदत घेण्यात येते. नागपुरात विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील क्रिकेट मैदानावर झालेल्या विविध सामन्यांच्या बंदोबस्ताचे सुमारे पावणेआठ कोटी रुपये थकीत आहेत. २०१० साली झालेल्या ‘आयपीएल’ सामन्यांच्या शुल्काचादेखील यात समावेश आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी जामठा येथे झालेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान घेण्यात आलेल्या पोलीस संरक्षणाबाबत माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. १ जानेवारी २०१२ ते ३० जून २०१६ या कालावधीत या मैदानावर झालेल्या किती सामन्यांत पोलीस दलाची सुरक्षा होती, किती पोलीस अधिकारी-कर्मचारी पुरविण्यात आले, पोलीस संरक्षण शुल्क किती होते व किती शुल्क थकीत आहे हे प्रश्न त्यांनी विचारले होते. नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या कालावधीत जामठा येथील क्रिकेट मैदानावर २०१० साली ‘आयपीएल’चे ३, २०१२ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना, २०१३ मध्ये भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी सामना, २०१५ सालचा भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका कसोटी सामना व २०१६ मध्ये ‘आयसीसी’ ‘टी-टष्ट्वेंटी’ विश्वचषकाच्या १० सामन्यांसाठी पोलीस संरक्षण पुरविण्यात आले होते. यातील २०१२ व २०१३ साली झालेल्या कसोटी सामन्यांसाठी ‘व्हीसीए’ने ५४ लाख ७२ हजार ७१० रुपयांचे संरक्षण शुल्क अदा केले. परंतु ‘आयपीएल’, २०१५ चा कसोटी सामना व २०१६ सालच्या विश्वचषकातील १० सामन्यांचे शुल्क अद्यापही भरलेले नाही. व्याजासह ही रक्कम ७ कोटी ७८ लाख ७८ हजार ४८९ इतकी होत आहे. (प्रतिनिधी)चार वर्षांत आठ हजारांवर पोलिसांचे संरक्षण२०१० ते २०१५ यापैकी २०११ वगळता इतर चार वर्षात जामठा येथे सामने झाले. या सामन्यांच्या संरक्षणासाठी थोडेथोडके नव्हे तर ८,४६३ पोलीस व्यस्त होते. यात ९३१ पोलीस अधिकारी व ७,५३२ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी सर्वात जास्त बंदोबस्त २०१० सालच्या ‘आयपीएल’ सामन्यांदरम्यान होता. यावेळी ६७९ पोलीस अधिकारी व ५,८०९ पोलीस कर्मचारी पुरविण्यात आले होते.२०१० साली जामठा येथील क्रिकेट मैदानावर ‘आयपीएल’चे तीन सामने झाले होते. यात पोलिसांशिवाय राज्य राखीव मनुष्य बळाचादेखील वापर करण्यात आला होता. पोलीस संरक्षणाची रक्कम २ कोटी ४९ लाख ४१ हजार ८२५ इतकी होती. ही रक्कम अद्यापही थकीत आहे. यासंदर्भात तत्कालीन पोलीस अधीक्षक सी.एच.वाकडे, डॉ.मनोजकुमार शर्मा व डॉ.आरती सिंह यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. विदर्भ क्रिकेट असोसिएनशने ही रक्कम भरणे बंधनकारक असल्याचे त्यात नमूद होते. परंतु बंदोबस्त व सेवाशुल्काची रक्कम अद्यापही भरण्यात आलेली नाही.