शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

डास दिसल्यास नागपूर महापालिका करणार ५०० रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 10:16 IST

डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आल्यास १०० ते ५०० रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे. त्यानंतरही उपाययोजना न केल्यास दररोज २० ते २०० रुपये दंड आकारला जाणार आहे.

ठळक मुद्देमनपा करणार कारवाईघरमालकांनाही बजावणार नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया यासारख्या आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने उपनियम तयार केले आहेत. त्यानुसार डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित घरमालकांना नोटीस बजावून अशी स्थळे नष्ट करण्याची सूचना देण्यात येईल. त्यानंतरही डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आल्यास १०० ते ५०० रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे. त्यानंतरही उपाययोजना न केल्यास दररोज २० ते २०० रुपये दंड आकारला जाणार आहे.महाराष्ट्र महापालिका कॉर्पोरेशन कायदा कलम ४५८ (१९)अंतर्गत डास चावल्याने होणाऱ्या आजाराला आळा घालणे व नियंत्रणासाठी उपनियम तयार करण्यात आले आहेत. यात दंडाचीही तरतूद आहे. याबाबतचे उपनियम मंजुरीसाठी मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आले आहेत. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. उपनियमातील तरतुदीनुसार डास उत्पत्तीची स्थळे जसे, पाण्याची टाकी, लहान पूल, खड्डे, विहीर,, डबके, नाली आदी ठिकाणी पाणी साचणार नाही. घरापुढे वा परिसरात साचणारे पाणी वाहून जाईल, यासाठी तरतूद करण्यात आली आहे. जर एखादी व्यक्ती डासांच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत असेल तर यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार करता येईल. तक्रारीनुसार संबंधिताला उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्याबाबत नोटीस बजावली जाईल. त्यानंतरही उपाययोजना न केल्यास दुसरी नोटीस बजावून दंड आकारला जाणार आहे.विशेष म्हणजे घराचे अवैध बांधकाम असल्यास अशा कंत्राटदारालाही नोटीस बजावली जाणार आहे. याबाबतचे अधिकार महापालिकेला आहे. विहिरीत डास होत असल्यास संबंधितांना नोटीस बजावली जाणार आहे. नियमानुसार दंड आकारला जाणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका