शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

गांधी अडले असते तर फाळणी झाली नसती : इंद्रेशकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:24 PM

महात्मा गांधी झुकले म्हणून देशाचे तुकडे झाले. ते अडून राहिले असते तर देशाची फाळणी झाली नसती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या स्वातंत्र्य उत्सवात देशातील एकाही क्रांतिकारकांच्या कुटुंबाला सहभागी करून घेण्यात आले नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा त्या उत्सवात सहभाग नव्हता. कारण देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढले होते. विभाजनासाठी नाही. १९४७ मध्ये देशाचे अवैध विभाजन झाले. तेव्हापासून सीमेवर शांती नाही, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी केली.

ठळक मुद्देदहा वर्षात लाहोर, रावळपिंडीत घर खरेदी करता येईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधी झुकले म्हणून देशाचे तुकडे झाले. ते अडून राहिले असते तर देशाची फाळणी झाली नसती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या स्वातंत्र्य उत्सवात देशातील एकाही क्रांतिकारकांच्या कुटुंबाला सहभागी करून घेण्यात आले नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा त्या उत्सवात सहभाग नव्हता. कारण देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढले होते. विभाजनासाठी नाही. १९४७ मध्ये देशाचे अवैध विभाजन झाले. तेव्हापासून सीमेवर शांती नाही, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी केली.गोकुळपेठ येथील हेडगेवार ब्लड बँकेच्या सभागृहात ‘देशातील सध्याची स्थिती’ या विषयावर इंद्रेशकुमार यांनी मत मांडले. या वेळी भारत-तिबेट सहयोग मंचचे प्रा. विजय केवलरामानी, हेडगेवार ब्लड बँकेचे सचिव अशोक पत्की, अ. भा. मुस्लीम मंचचे विराग पाचपोर उपस्थित होते. यावेळी इंद्रेशकुमार म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने बलिदान दिले. देशाच्या सुरक्षेसाठी सैन्याला मोकळीक देऊन पाकिस्तानला एक ठोस संदेश दिला. आता भारताने पाकिस्तानला चार पर्याय दिले आहेत. कोणता पर्याय ठीक वाटतो हे त्याला ठरवायचे आहे. पण आपले सैन्य दाखवित असलेले शौर्य पाहता पुढील दहा वर्षात भारतीयांना लाहोर, रावळपिंडीतही घर, मालमत्ता खरेदी करण्याची संधी आहे, असा इशाराही इंद्रेशकुमार यांनी पाकिस्तानला दिला.२०१४ नंतर एक नवा भारत जन्माला आला आहे. आपण ५५ वर्षे देश लुटणाºयांना संधी दिली. तर पुढील २० वर्षे देश घडविणाऱ्यांना संधी देऊ शकत नाही का, असा सवालही त्यांनी केला. अमेरिकेसारख्या देशाचे स्वत:चे चरित्र नाही व तो देश आम्हाला चारित्र्याचे प्रमाणपत्र वाटत फिरत आहे. भोगवादी मूल्य बाळगणारे आम्हाला नैतिकतेचे पाठ शिकवित आहेत. त्यांच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही, असेही त्यांनी सुनावले.आपल्यातील संवाद संपला आहेएका धर्माचा दुसऱ्या धर्माशी संवाद संपला आहे. त्या त्या धर्मात अंतर्गत संवादही होताना दिसत नाही. जाती-जातींमध्येही संवाद होत नाही. जेथे संवादाचा अभाव असतो तेथे अशांती व मतभेद वाढतात. संवादहिनता किंवा संवादातील कट्टरता दिसून येते. आम्हाला दंगे, हिंसाचाराचा देश नको आहे. प्रेमाचा देश हवा आहे. त्यासाठी सर्वांनीच आपली जबाबजारी पार पाडणे आवश्यक आहे, असेही इंद्रेशकुमार म्हणाले.हास्ययोगातून मनप्रसन्नतेचे धडे इंद्रेशकुमार यांनी भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांकडून हास्ययोग करवून घेत मनप्रसन्नतेचे धडे दिले. यानंतर सर्व धर्मांचे मंत्र म्हणलायला लावत सर्वधर्मसमभाव जपण्याचे आवाहन केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMahatma Gandhiमहात्मा गांधी