शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्यास गुन्हे दाखल करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 20:18 IST

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजना २०१७-१८ अंतर्गत नागपूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्केर्टिंग फेडरेशनमार्फत चणा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचाच चणा शासकीय हमीभावाने खरेदी करावयाचा आहे. कुठल्याही परिस्थितीत व्यापाऱ्यांकडून शासकीय केंद्रावर खरेदी होणार नाही, याची काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांकडून खरेदी झालेली आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी सचिन कुर्वे : शासकीय चणा खरेदी केंद्रे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजना २०१७-१८ अंतर्गत नागपूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्केर्टिंग फेडरेशनमार्फत चणा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचाच चणा शासकीय हमीभावाने खरेदी करावयाचा आहे. कुठल्याही परिस्थितीत व्यापाऱ्यांकडून शासकीय केंद्रावर खरेदी होणार नाही, याची काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांकडून खरेदी झालेली आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.जिल्हा पणन अधिकारी यांच्या आदेशान्वये एफ.ए.क्यू. चणा रु. ४४०० (बोनससह) प्रति क्विंटल, आधारभूत दराने खालील चणा खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येईल. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आधारभूत भावाने शासकीय केंद्रावर विक्री करावयाची असल्यास तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संस्था व कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर (कळमना़), काटोल, उमरेड, भिवापूर, कळमेश्वर, सावनेर, नरखेड, रामटेक यांचे कार्यालयात संपर्क साधावा. सदर शासकीय आधारभूत चणा खरेदी केंद्रे वरील सर्व ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. चणा खरेदी ही संपूर्ण आॅनलाईन पध्दतीने करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून याकरिता शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत व ७/१२ चा पीक पेऱ्यासह उतारा असणे गरजेचे आहे. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर सदर नोंदणीनुसार शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे धान्य कृषी उत्पन्न बाजार समिती शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांवर विक्रीकरिता आणण्याचे दिनांक कळविण्यात येईल. वरील पध्दतीप्रमाणेच चणा खरेदी करण्यात येईल. चणा खरेदीचे पेमेंट आॅनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.कमी भावाने विक्री करू नका कुठल्याही परिस्थितीत हमी भावापेक्षा कमी भावाने चना बाजारामध्ये शेतकऱ्यांनी विकु नये, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी डॉ. अतुल नेरकर यांनी केले. चन्याचा ओलावा १४ टक्के पर्यंत असावा, अशी अट दजार्बाबत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तुर स्वच्छ, वाळवुन, साफ करुन, एफ.ए.क्यु. दजार्चा चना विक्रीकरिता आणावा, असे डॉ. नेरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयnagpurनागपूर