शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

३३० युनिटचा उपयोग केल्यास १६५ युनिटचे लागेल दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 23:15 IST

मीटर रीडिंग व वीज बिलाच्या वितरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. वाढीव वीज बिल आल्याने ग्राहक महावितरणच्या कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. दरम्यान महावितरणने स्पष्ट केले की, ग्राहकांना ‘स्लॅब बेनिफिट’चा लाभ देण्यात येत आहे. ग्राहकांना ३३० युनिट वापरल्याचे बिल आले असेल तर त्यांच्याकडून १६५ युनिट दराने बिलाची आकारणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणने ‘स्लॅब बेनिफिट’ देण्याचा केला दावा : वाढत्या वीज बिलामुळे नागरिक त्रस्त

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : मीटर रीडिंग व वीज बिलाच्या वितरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. वाढीव वीज बिल आल्याने ग्राहक महावितरणच्या कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. दरम्यान महावितरणने स्पष्ट केले की, ग्राहकांना ‘स्लॅब बेनिफिट’चा लाभ देण्यात येत आहे. ग्राहकांना ३३० युनिट वापरल्याचे बिल आले असेल तर त्यांच्याकडून १६५ युनिट दराने बिलाची आकारणी करण्यात येणार आहे.लॉकडाऊनमुळे २३ मार्चनंतर मीटर रीडिंग व वीज बिल वाटण्याचे काम बंद करण्यात आले होते. या महिन्यापासून पुन्हा दोन्ही काम महावितरणने सुरू केले आहे. त्यामुळे ग्राहकांना दोन ते अडीच महिन्याचे बिल येत आहे. ज्या ग्राहकांनी गेल्या दोन महिन्यात पैसे भरले आहे, त्यांचे वीज बिल समायोजित करण्यात येत आहे. मात्र वीज बिलापोटी मोठी रक्कम भरावी लागत असल्याची ओरड ग्राहकांची आहे. दरम्यान महावितरणने दावा केला की, बिल दोन ते अडीच महिन्याचे आले असले तरी, ग्राहकांना स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. वीज बिलाची आकारणीसाठी शून्य ते १०० युनिट, १०१ ते ३०० युनिट याप्रमाणे टप्पे पाडण्यात आले आहे. कमी वीज वापरल्यास कमी बिल येते. मात्र ग्राहकांचा संशय आहे की महावितरणने वीज आकारणीचे जे टप्पे पाडले आहे, त्यानुसार बिल देण्यात आले नाही. महावितरणने ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन केले आहे. कॉम्प्युटराईज बिलात ग्राहकांना स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. फिक्स चार्ज, विद्युत शुल्क सोडून अन्य शुल्क समायोजित करण्यात येणार आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, प्रशासनाच्या परवानगीनंतरच सील असलेल्या वस्त्या सोडून इतर भागात मीटर रीडिंगचे काम सुरू आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल