शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पार पडला आदर्श निकाह; स्वागत समारंभही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 17:05 IST

सधन आणि शिक्षित मुस्लिम कुटुंबातील मुला-मुलीचा निकाह आदर्श पद्धतीने करून संपूर्ण लग्न व स्वागत समारंभाचा खर्च गोरगरिबांच्या भोजनासाठी देण्यात आला. विशेष म्हणजे, वर-वधू आणि मौलवींसह केवळ पाच जण या निकाहला हजर होते आणि त्या सर्वांनीच ‘सोशल डिस्टन्सिंग’चेही पालन केले.

ठळक मुद्देलग्न समारंभाच्या खर्चातून गरिबांना भोजनदान

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सधन आणि शिक्षित मुस्लिम कुटुंबातील मुला-मुलीचा निकाह आदर्श पद्धतीने करून संपूर्ण लग्न व स्वागत समारंभाचा खर्च गोरगरिबांच्या भोजनासाठी देण्यात आला. विशेष म्हणजे, वर-वधू आणि मौलवींसह केवळ पाच जण या निकाहला हजर होते आणि त्या सर्वांनीच ‘सोशल डिस्टन्सिंग’चेही पालन केले.बाबा ताज कॉलनीत राहणाऱ्या शमा आणि मुमताज काझी यांचे चिरंजीव मोहसिन काझी यांचा निकाह अफरोज बानो बशीर अहमद शेख यांची मुलगी नसरीन शेख हिच्यासोबत ५ एप्रिलला पार पडणार होता. मात्र, लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे विवाहाची झालेली संपूर्ण तयारी जागच्या जागीच राहिली. हा निकाह पुढे ढकलण्यात आला. दोन आठवड्यानंतर लॉकडाऊन संपेल, अशी अपेक्षा होती. तो संपल्यानंतरच हा निकाह करण्याचे ठरले होते. परंतु कोरोनाचा प्रकोप वाढतच असल्याने हा निकाहही आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली. ती लक्षात घेता दोन्ही कुटुंबीय तसेच त्यांच्या नातेवाईकांनी विचारविमर्श करून साध्या पद्धतीने निकाह पार पाडण्याचे ठरविले. त्यानुसार १८ एप्रिलला सायंकाळी ५ च्या सुमारास वर-वधू आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी एक व्यक्ती तसेच मौलवी अशा एकूण पाच जणांच्या उपस्थितीत हा निकाह पार पडला.विशेष म्हणजे, निकाहदरम्यान वर-वधूसह सर्वांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चेही पालन केले. प्रत्येकाच्या तोंडावर मास्कही होता. आधी ठरल्याप्रमाणे निकाहच्या दुसºया दिवशी मोठा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. परंतु लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता तो रद्द करून लग्न तसेच स्वागत समारंभावर येणारा संपूर्ण खर्च उत्तर नागपुरातील मुस्लिम वस्त्यांमधील गरिबांच्या भोजनदानावर खर्च करण्यात आला.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस