शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसपेक्षा आंबेडकरांशी युती करायला आवडेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:52 IST

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाइंशी युती करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनुकूल आहेत. परंतु आपल्याला अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करायला अधिक आवडेल, असे सांगत रिपाइंचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी गुरुवारी जाहीर पत्रपरिषदेद्वारे प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला.

ठळक मुद्देराजेंद्र गवई : रिपाइं-भारिप-बसपाची व्हावी युती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाइंशी युती करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनुकूल आहेत. परंतु आपल्याला अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करायला अधिक आवडेल, असे सांगत रिपाइंचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी गुरुवारी जाहीर पत्रपरिषदेद्वारे प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला.डॉ. गवई म्हणाले, २०१९ ची लोकसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची राहणार आहे. आंबेडकरी समाजाची मते विभागली जाऊ नये, यासाठी महाराष्ट्रात रिपाइं-बसपा व भारिप बहुजन महासंघ यांची आघाडी व्हावी, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. यासंदर्भात आपण स्वत: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि मायावती यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अ‍ॅड. आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडी स्थापन केली आहे. त्यांच्यासोबत एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवेसी हे सुद्धा आहेत. तर काँग्रेस ओवेसी यांच्यासोबत राहणार नाही, असे त्यांच्या नेत्यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस व भारिपची युती होईल, असे वाटत नाही.आगामी लोकसभा निवडणुुकीत आपण स्वत: अमरावती लोकसभा मतदार संघातून लढणार आहोत. आपली तयारी सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती झाली तर मिळून लढू, अन्यथा नाईलाजास्तव काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करू. परंतु अमरावतीची जागा ही पक्षाच्याच एबी फॉर्मवर लढवली जाईल, असेही ते म्हणाले.पत्रपरिषदेत प्रकाश कुंभे, प्राचार्य डी. दाभाडे, डी.एल.सोनपिंपळे, भीमराव वाहाणे, प्रा. बुद्धराज मून, सुहास भालेराव, एकनाथ ताकसांडे, विश्वनाथ खांडेकर आदी उपस्थित होते.प्रामाणिक व्यक्तीला नक्षलवादी ठरवू नयेनक्षलवादी समर्थक म्हणून पोलिसांकडून सुरू असलेल्या अटकसत्राबाबत विचारले असता डॉ. राजेंद्र गवई म्हणाले, पोलिसांनी आपला तपास करावा. परंतु समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाही. तपास योग्य व्हावा, कुठल्याही प्रामाणिक व्यक्तीला नक्षलवदी ठरवण्यात येऊ नये.

टॅग्स :Politicsराजकारणnagpurनागपूर