शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मला हेलिकॉप्टरने येऊन निवडणूक अर्ज भरायचाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:24 IST

एका भावी उमेदवाराला विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरने यायचंय.या भावी उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात रीतसर अर्ज करून परवानगी मागितली आहे.

ठळक मुद्देभावी उमेदवाराने प्रशासनाला मागितली परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका भावी उमेदवाराला विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरने यायचंय. विशेष म्हणजे खूप दूरून नाही. तर तीन ते चार किमी अंतरावरून यायचे आहे. आश्चर्य वाटेल, परंतु ही गोष्ट खरी आहे. तसेही स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी उमेदवार काहीही करतात. असाच काहीसा प्रकार नागपुरात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यासाठी या भावी उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात रीतसर अर्ज करून परवानगी मागितली आहे.या उमेदवाराला उत्तर नागपुरातून उमेदवारी अर्ज भरायचा आहे. निवडणूक अर्ज भरण्यासाठी त्यांना हेलिकॉप्टरने यायचे आहे. इंदोरा चौक येथून हेलिकॉप्टरने दीक्षाभूमीवर पुष्पप्वृष्टी करायची व नंतर कस्तूरचंद पार्कवर हेलिकॉप्टर उतरवण्याची त्यांची इच्छा आहे. यासाठी त्यांनी रीतसर परवानगी मागितली आहे. उमेदवाराला ३ ते ४ तारखेला निवडणुकीचा अर्ज भरायचा आहे. यासाठी एनओसी आवश्यक असून ते पोलीस, मनपा, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागांशी पत्रव्यवहार करीत आहेत.मुंबईहून येणार हेलिकॉप्टरया उमेदवारांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, त्यांना पक्षाचे तिकीट निश्चितच मिळणार आहे. केवळ पक्षाच्या एबी फॉर्मची प्रतीक्षा आहे. हेलिकॉप्टरसाठी ते एका कंपनीशी चर्चा करीत आहेत. मुंबईवरून ते हेलिकॉप्टर येणार आहेत. निवडणूक आयोगाने २८ लाख रुपयापर्यंत खर्च करण्याची परवानगी दिली आहे. सर्व खर्च या सीमेतच केला जाईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Helicopter Eelaहेलिकॉप्टर ईला