शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

.. तर प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्याची माझी तयारी; नाना पटोले यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:26 IST

कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली तर ती स्विकारण्याची माझी तयारी आहे, असे वक्तव्य कॉंग्रेस नेते व नागपूर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी केले आहे. या वक्तव्यातून ते प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देराजकीय संन्यासाची घोषणा हा माझा ‘जुमला’च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली तर ती स्विकारण्याची माझी तयारी आहे, असे वक्तव्य कॉंग्रेस नेते व नागपूर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी केले आहे. या वक्तव्यातून ते प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.नाना पटोले व कॉंग्रेसच्या नेत्यांवर निवडणूक कामात अडथळे आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. मी जर लोकसभा निवडणूकीत नितीन गडकरी यांच्याकडून पराभूत झालो तर राजकीय संन्यास घेईल, अशी घोषणा पटोले यांनी केली होती. यासंदर्भात त्यांना विचारले असता तो माझा केवळ ‘जुमला’च होता. भाजपचे लोक संन्याशांना राजकारणात आणतात आणि मी एकदा पराभूत झालो तर संन्यास घ्यायला सांगतात. मी राजकीय संन्यास घणार नाही, असे त्यांनी सांगितले. गडकरी व भाजप नेते यांनी आतापर्यंत १०० जुमले केले होते. मी जर एक जुमला केला तर काय बिघडले, असे प्रतिपादन पटोले यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी भंडारा-गोंदियातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आवाहन पटोले यांनी दिले.निवडणूकीत अडथळा केल्याप्रकरणी नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र मुद्गल व जिल्हा प्रशासनाने निवडणूक काळात आमच्यासोबत दुजाभाव केला. आम्हाला ईव्हीएमची तपासणी करुन दिली नाही. मतदार यादी उशीरा दिली. पटोले यांनी मुद्गल यांना न्यायालयात खेचणार असल्याचे सांगितले. यावेळी पत्रपरिषदेला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह अभिजीत वंजारी, अतुल लोंढे हेदेखील उपस्थित होते.गिरीश महाजन ‘फोकनाड’यावेळी नाना पटोले यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ‘फोकनाड’ असे म्हणून त्यांच्यावर जहरी टीका केली. महाजन यांना जळगाव जिल्ह्यातील दुष्काळ निराकरणाच्या अर्थसंकल्पाच्या निधीची माहिती नाही. त्यांना उत्तर देण्यासाठीच मी राजकीय संन्यासाचा ‘जुमला’ मांडला, असे नाना पटोले म्हणाले.तापमान ‘सेल्सिअस’मध्ये की टक्क्यांमध्ये?या पत्रपरिषदेदरम्यान पटोले हे फार संभ्रमात असलेले दिसून आले. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे नाव ते सातत्याने अश्विनी म्हणून घेत होते. याशिवाय नागपुरचे तापमान ६७ टक्क्यांवर पोहोचले असे अगोदर वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितल्यावर शहरातील तापमान ‘सेल्सिअस’ऐवजी चक्क ४७ टक्क्यांवर पोहोचल्याचे सांगितले.वंचित बहुजन आघाडीच्या मागे मास्टरमाइंड कोण?यावेळी पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीवरदेखील टीका केली. भाजप, आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रचार साहित्य सारखेच होते. त्यातूनच वंचित आघाडी भाजपची ‘टीम बी’ असल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मागे ‘मास्टरमाईंड’ कोण आहे याच विचार करावा, असे नाना पटोले म्हणाले.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले