शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादसाठी आता एसटीची शिवशाही एसी स्लिपर बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:28 IST

खासगी प्रवासी वाहतुकीला तोड देऊन प्रवाशांना आरामदायी सुखकर सेवा पुरविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नागपूरवरून हैदराबादसाठी शिवशाही वातानुकूलित स्लिपर बससेवेचा शुभारंभ केला आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधा : पंढरपूर, आदिलाबाद, निर्मल, निजामाबाद मार्गे धावणार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खासगी प्रवासी वाहतुकीला तोड देऊन प्रवाशांना आरामदायी सुखकर सेवा पुरविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नागपूरवरून हैदराबादसाठी शिवशाही वातानुकूलित स्लिपर बससेवेचा शुभारंभ केला आहे.हैदराबादला सोडण्यात येणारी एसटीची शिवशाही वातानुकूलित स्लिपर बस गणेशपेठ बसस्थानकावरून दुपारी ३ वाजता सुटून हैदराबादला पहाटे २.२५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात हैदराबाद येथून ही बस सायंकाळी ६.३० वाजता सुटून नागपूरला सकाळी ५.५५ वाजता पोहोचेल. ही बस पांढरकवडा, आदिलाबाद, निर्मल, निजामाबाद मार्गे धावणार आहे. प्रवाशांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवशाही, शिवनेरी, वातानुकूलित व इतर प्रवासी बसेससोबत शिवशाही वातानुकूलित स्लिपर बसचे आरक्षण महामंडळाच्या संकेतस्थळावरून आॅनलाईन करता येईल. सदर शिवशाही बस वातानुकूलित स्लिपर असून आकर्षक डिजिटल बोर्ड, मोबाईल चार्जर, सीसीटीव्ही कॅमेरा, अनाऊन्समेंट सिस्टीमचा यात समावेश आहे. शुभारंभ प्रसंगी गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक विजय कुडे यांनी या बसमधील प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रवाशांनी या शिवशाही वातानुकूलित स्लिपर बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर विभागाच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे............

टॅग्स :Shivshahiशिवशाहीnagpurनागपूर