शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘हायब्रिड एरोबोट’ प्रकल्प नागपुरात; गडकरींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 07:10 IST

देशभरातील प्रमुख जलमार्गांत जल, जमीन व हवेत चालणारी ‘हायब्रिड एरोबोट’ चालविण्यात येणार आहे.

नागपूर : देशांतर्गत जलवाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात एक नवे पाऊल टाकण्यात येत आहे. देशभरातील प्रमुख जलमार्गांत जल, जमीन व हवेत चालणारी ‘हायब्रिड एरोबोट’ चालविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, याचा उत्पादन प्रकल्प रशियातील एका कंपनीच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे सुरू करण्यात येणार आहे.गडकरी यांनीच यासंदर्भात शुक्रवारी सविस्तर माहिती दिली. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रशियातील ‘स्कोल्कोव्हो एरोस्पेस क्लस्टर’चे मुख्य समन्वयक सुक्रित शरन उपस्थित होते. भारतातील अंतर्गत जलमार्गांमध्ये अनेकदा दलदलयुक्त प्रदेश, बर्फाळ क्षेत्र यांचा अडथळा येतो. मात्र या अडथळ्यांवर मात करणाऱ्या ‘हायब्रिड एरोबोट’ रशियात तयार करण्यात आल्या आहेत. या बोटी अवघे १० सेमी पाणी असलेल्या चिखलयुक्त प्रदेशातून चालू शकतात. सोबतच बर्फातदेखील यांचा उपयोग होऊ शकतो. पेट्रोल, विद्युत यांच्यासोबतच ‘मिथॅनोल’वरदेखील या बोटी चालू शकतात. सर्वसाधारण बोटींपेक्षा यांचा वेग तीन पटीने जास्त असून ८५ किमी प्रति तास या वेगाने त्या पाण्यात सहज चालू शकतात. या बोटींची प्रवासी क्षमता ही ११ ते ६० प्रवाशांपर्यंत आहे, अशी माहिती गडकरींनी दिली.विदर्भाला वरदान‘हायब्रिड एरोबोट’संदर्भात ‘लोकमत’ने सर्वात अगोदर वृत्त प्रकाशित केले होते. कोराडीत हा प्रकल्प येत्या चार महिन्यात उभा राहिल. यामुळे विदर्भात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकnagpurनागपूरNitin Gadkariनितीन गडकरी