शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी सोडून गेल्याने पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:43 IST

पत्नी घरी परत न आल्याने दु:खी असलेल्या पतीने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही घटना जरीपटका परिसरात सोमवारी रात्री घडली.

ठळक मुद्देनागपूरच्या जरीपटका भागातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नी घरी परत न आल्याने दु:खी असलेल्या पतीने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही घटना जरीपटका परिसरात सोमवारी रात्री घडली.राजेंद्र रामकिशन ढोले (३५) रा. कपिलनगर असे जखमी पतीचे नाव आहे. राजेंद्रची पत्नी काही दिवसांपासून आपल्या घरी परत येत नव्हती. त्यामुळे तो दु:खी होता. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास राजेंद्रने अचानक कुठल्यातरी वस्तूने आपल्या हाताची नस कापून स्वत:ला जखमी केले. रेखाबाई ढोले यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.दोघांनी घेतला गळफासगिट्टीखदान व यशोधरानगर परिसरात सोमवारी दोघांनी आपापल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पहिली घटना गिट्टीखदान परिसरातील हजारीपहाड येथे घडली. मुकेश आटा चक्कीजवळ राहणाऱ्या समुवेद सुनील बनेवार (३०) याने दुपारी १ वाजता आपल्या घरी गळफास घेतला. उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचप्रकारे यशोधरानगर येथील इंदिरा माता नगर येथील गणेश ताराचंद सहारे (४२) याने सायंकाळी ५ वाजता खोलीत गळफास घेतला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.स्वत:ला जाळून घेतलेपाचपावलीतील बंगाली पंजा परिसरात २७ वर्षीय युवकाने स्वत:च्या अंगावर केरोसीन टाकून जाळून घेतले. मो. शोएब मो. असलम असे मृताचे नाव आहे. १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता शोएबने आपल्या घरीच स्वत:च्या अंगावर केरोसीन टाकून जाळून घेतले. त्याला उपचरासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ६ म रोजी त्याचा मृत्यू झाला. पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

महिलेसह दोघांनी घेतले विष  नंदनवन परिसरात एका नवविवाहितेसह दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. पहिली घटना नंदनवन परिसरात रविवारी घडली. प्रतिक्षा राहुल वासनिक (२२) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री १० वाजता प्रतिक्षाने विषप्राशन केले. तिची प्रकृती बिघडल्याने तिला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी ६ मे रोजी रात्री ११ वाजता तिचा मृत्यू झाला. दुसरी घटना नंदनवन येथील शक्तिमाता नगरात घडली. ४ एप्रिल रोजी रात्री १० वाजता घडली. पुरुषोत्तम विठोबाजी मोहाडीर (६५) असे मृताचे नाव आहे. विषयुक्त औषध प्राशन केल्याचे त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर