शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
2
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
3
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
5
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
6
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
7
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
8
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
9
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
10
शाहरुखकडून झाली 'गलती से मिस्टेक'! व्हिडीओ शूट करताना 'या' आगामी सिनेमाची स्क्रीप्ट दिसली
11
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
12
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
13
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
14
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
15
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
16
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
17
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
18
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
20
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!

पोटगीसाठी पतीचे निवृत्तिवेतन जप्त करता येते

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 5:28 AM

पती हा पत्नीला, कायदेशीररीत्या मंजूर झालेली पोटगी अदा करीत नसेल तर, अशा परिस्थितीत पत्नीला संबंधित पोटगी मिळवून देण्यासाठी पतीच्या निवृत्तिवेतनावर जप्ती आणता येते,

- राकेश घानोडे नागपूर : पती हा पत्नीला, कायदेशीररीत्या मंजूर झालेली पोटगी अदा करीत नसेल तर, अशा परिस्थितीत पत्नीला संबंधित पोटगी मिळवून देण्यासाठी पतीच्या निवृत्तिवेतनावर जप्ती आणता येते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. या निर्णयामुळे कायदेशीर तरतूद स्पष्ट झाली.निवृत्तिवेतन कायदा-१८७१ मधील कलम ११ अनुसार निवृत्तिवेतनावर जप्ती आणता येत नाही असा दावा सेवानिवृत्त पतीने केला होता. न्याय दंडाधिकारी न्यायालयाने पत्नीच्या पोटगीसाठी निवृत्तिवेतन जप्तीचा आदेश दिल्यामुळे या तरतुदीचे उल्लंघन झाले. तसेच, हा वादग्रस्त आदेश जारी करण्यापूर्वी सुनावणीची संधी देण्यात आली नाही असेही पतीचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने पतीचा हा मुद्दा निरर्थक ठरवला. संबंधित कलम ११ अनुसार दिवाणी दाव्यामध्ये कर्जदात्याच्या मागणीवरून निवृत्तिवेतनावर जप्ती आणता येत नाही. या प्रकरणाची तुलना दिवाणी दाव्याशी केली जाऊ शकत नाही. कारण, पत्नी ही पतीची कर्जदाती नाही व पोटगी म्हणजे कर्ज नव्हे. परिणामी, ही तरतूद या प्रकरणाला लागू होत नाही. पत्नीला पोटगी मिळवून देण्यासाठी पतीच्या निवृत्तिवेतनावर जप्ती आणता येते, असे उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.प्रकरणातील पत्नीने न्याय दंडाधिकारी न्यायालयात घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये पत्नीला ३० हजार रुपये अंतरिम पोटगी मंजूर करण्यात आली होती. पतीला हा आदेश मान्य नव्हता. त्यामुळे तो पत्नीला पोटगी अदा करीत नव्हता.ही बाब न्याय दंडाधिकारी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी पतीच्या निवृत्तिवेतनावर जप्ती आणण्याचा व त्यातून पत्नीला पोटगी अदा करण्याचा आदेश दिला. त्याविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. भगवंत व राधिका अशी प्रकरणातील पती-पत्नीची नावे असून ते अमरावती येथील रहिवासी आहेत.>पतीचे निवृत्तिवेतन ७२ हजारनिवृत्तीपूर्वी पतीला १ लाख ५३ हजार रुपये मासिक वेतन मिळत होते. निवृत्तीनंतर त्याला ७२ हजार रुपये मासिक निवृत्तिवेतन मिळते. तो अमरावती येथे स्वत:च्या घरी राहतो. तसेच, त्याने नागपूर येथे रो हाऊस खरेदी केले आहे. सध्या त्याच्यावर कुणीच अवलंबून नाही. सेवानिवृत्तीनंतर त्याला सर्व लाभ मिळून २० लाख रुपये मिळाले होते.