शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातून पती-पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:44 IST

कौटुंबिक वाद विकोपास गेल्याने पत्नीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेतली. तिच्या पाठोपाठ पतीनेही त्याच विहिरीत उडी घेतली. त्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना काटोल शहरातील अर्जुननगर भागात मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देविहिरीत घेतली उडी : नागपूर जिल्ह्यातील काटोल शहरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (काटोल) : कौटुंबिक वाद विकोपास गेल्याने पत्नीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेतली. तिच्या पाठोपाठ पतीनेही त्याच विहिरीत उडी घेतली. त्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना काटोल शहरातील अर्जुननगर भागात मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.गजानन नत्थू धोटे (४६) व शुभांगी गजानन धोटे (४०) रा. शेटे ले-आऊट, अर्जुननगर, काटोल अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. गजानन हा मूळचा काटोल तालुक्यातील येरला (धोटे) येथील रहिवासी असून, तो काही वर्षांपासून अर्जुननगरातील शेटे ले-आऊटमध्ये राहायचा. तिथे त्याचे स्वत:चे घर आहे. तो मंगळवारी (दि. १६) दुपारी २ वाजताच्या सुमारास घरी दारू पिऊन आला आणि पत्नी शुभांगीसोबत भांडायला लागला. भांडण विकोपास गेल्याने शुभांगीने दार उघडून जवळच असलेल्या विहिरीच्या दिशेने धाव घेतली आणि लगेच विहिरीत उडी मारली.तिच्याच मागे गजानन निघाला होता. त्यानेही तिच्या पाठोपाठ त्याच विहिरीत उडी मारली. हा प्रकार लक्षात येताच एका शेजाऱ्याने त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत दोर सोडला. शुभांगीने दोर पकडला असता, गजानननेही दार पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात शुभांगीच्या हातून दोर सुटला आणि ती पाण्यात बुडाली. दुसरीकडे, उडी मारताना गजाननच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला पोहता येत असले तरी तो पोहू शकला नाही. त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठविले. वृत्त लिहिस्तो या घटनेबाबत कुणीही पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर