शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बेवफा औरत को काटके आया; नागपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 10:31 IST

रक्ताने माखलेले कपडे आणि हातात धारदार शस्त्र घेऊन एक आरोपी गुरुवारी रात्री नागपूर अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहचला. थेट ठाणेदाराच्या कक्षात शिरून त्याने ‘बेवफा औरत को काटके आया’असे म्हणत ठाण्यात बैठक मांडली.

ठळक मुद्देरक्ताने माखलेला आरोपी ठाण्यातस्वत:च दिली कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रक्ताने माखलेले कपडे आणि हातात धारदार शस्त्र घेऊन एक आरोपी गुरुवारी रात्री अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहचला. थेट ठाणेदाराच्या कक्षात शिरून त्याने ‘बेवफा औरत को काटके आया’असे म्हणत ठाण्यात बैठक मांडली. त्याच्या या वर्तनाने काही वेळेसाठी पोलिसही गोंधळले. मात्र, लगेच त्यांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. काहीशी नाट्यमय वाटणारी ही थरारक घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजयनगरात गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास घडली. रामदिनेश मिश्रा (वय ४४) असे आरोपीचे तर मंजुला मिश्रा (वय ३७) असे त्याच्या मृत पत्नीचे नाव आहे. आरोपी मिश्रा हा आचारी असून, त्याला १५ वर्षांची गतिमंद मुलगी आहे. तो संजयनगरातील शिवसेना कार्यालयाजवळ राहत होता. पत्नी मंजुलाचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध आहेत, असा त्याला संशय होता. त्यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. त्याने तिला सांभाळण्याचा अनेकदा इशाराही दिला होता. पत्नी असे काहीच नाही म्हणून सांगत होती. मात्र, आरोपीच्या डोक्यातील संशयाचा किडा काही केल्या स्वस्थ बसत नव्हता. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास त्याला काय दिसले माहीत नाही, त्याने पत्नीसोबत वाद घातला. त्यानंतर चायनीज चॉपरने पत्नी मंजुलावर आठ ते दहा घाव घालून तिला घरातच रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. ती मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर रक्ताने माखलेल्या कपड्याने तो सरळ अंबाझरी ठाण्यात पोहचला. त्याने ठाणेदार भीमराव खंदाळे यांचा कक्ष गाठून पत्नीला ठार मारून आल्याची माहिती दिली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याचे नाव, पत्ता विचारला. त्यानंतर त्याचे घर गाठून पंचनामा करत मंजुलाचा मृतदेह मेडिकलला पाठविला.परिसरात प्रचंड दहशतया थरारक हत्याकांडाने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. पोलीस पोहचेपर्यंत तेथे मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे, मिश्रा दाम्पत्याला असलेली १५ वर्षीय मुलगी गतिमंद आहे. तिला काय झाले हे पुरते कळले नसले तरी काही तरी भयावह झाले याची तिला जाणीव झाली होती. त्यामुळे त्या बिचारीची अवस्था सैरभैर झाली होती. पोलिसांनी तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. आरोपी मिश्राला अटक करण्यात आली.

 

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून