शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दारुसाठी हटकल्याने पतीची आत्महत्या, प्रेमविवाहाचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 18:23 IST

पत्नीने दारू पिण्यास हटकल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो रोज दारू पिऊन येत असल्याने पत्नी त्याला हटकत होती. त्यावरून दोघांत नेहमीच खटके उडायचे.

नागपूर : पत्नीने दारुसाठी हटकल्यामुळे पतीने मनाला लावून घेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राजीवनगरात उघडकीस आली. रोहित मुकेश शिंगाडे (२०) रा. तुमसर असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हा मूळचा भंडारा जिल्ह्यातील तुमसरचा रहिवासी आहे. त्याचे शेजारी राहणाऱ्या निकिताशी (२०) सूत जुळले. दोघांच्या प्रेमसंबंधाची वस्तीत चर्चा होती. त्यामुळे निकिताच्या कुटुंबीयांनी तिला विरोध करीत शिक्षण बंद केले. मात्र, रोहितने तिला थेट पळवून आणले आणि प्रेमविवाह केला.

एक वर्षांपूर्वी ते कामाच्या शोधात नागपुरात आले. त्याला एमआयडीसीतील एका कंपनीत काम मिळाले. दोघांनीही सुखी संसार सुरू केला. त्यांना चार महिन्यांचा मुलगा आहे. मात्र, यादरम्यान रोहितला दारुचे व्यसन जडले. तो रोज दारू पिऊन घरी यायचा, त्यामुळे निकिता नेहमी हटकत होती. दारुवरुन दोघांत नेहमी खटके उडत होते. दरम्यान, २८ डिसेंबरला तो रात्री नेहमीसारखाच दारू पिऊन घरी आला, व त्याला निकीताने हटकले. त्यामुळे त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदार