शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुरावा नसताना पतीवर चारित्र्यहीनतेचा आरोप केला जाऊ शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 01:32 IST

कोणताही ठोस पुरावा नसताना पतीवर चारित्र्यहीनतेचा आरोप केला जाऊ शकत नाही. पत्नी असे आरोप करीत असेल तर, ती कृती पतीसोबतची क्रू रता ठरते असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी एका प्रकरणात दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा पत्नीला दणका : घटस्फोटाविरुद्धचे अपील फेटाळले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोणताही ठोस पुरावा नसताना पतीवर चारित्र्यहीनतेचा आरोप केला जाऊ शकत नाही. पत्नी असे आरोप करीत असेल तर, ती कृती पतीसोबतची क्रू रता ठरते असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी एका प्रकरणात दिला आहे.प्रकरणातील दाम्पत्य जिया व दीप (काल्पनिक नावे) नागपूर येथील रहिवासी असून त्यांनी २७ जून २०१२ रोजी प्रेम विवाह केला होता. त्याच्या तीन-चार वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांत प्रेमात झाले होते. जिया लग्नानंतर दोनच महिन्यात माहेरी निघून गेली. त्यानंतर तिने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. त्यात तिने दीपविरुद्ध विविध गंभीर आरोप करून दीपची क्रूरता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व आरोप तथ्यहीन आढळून आल्यामुळे न्यायालयाने तिची याचिका खारीज केली. जियाच्या आरोपांमुळे दीप दुखावला गेला होता. परिणामी, त्याने जियासोबत संबंध तोडण्याचा निर्णय घेऊन जियाच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. ३१ जुलै २०१७ रोजी ती याचिका मंजूर झाली. त्या निर्णयाविरुद्ध जियाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता तिचे अपील फेटाळून कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.कुटुंब न्यायालयात बयान देताना जियाने दीपवर चारित्र्यहीनतेचा आरोप केला. दीपचे त्याच्या मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे ती म्हणाली. परंतु, याबाबत तिला ठोस पुरावा सादर करता आला नाही. उच्च न्यायालयाने जियाचे हे वागणे क्रूरतापूर्ण ठरवले. ठोस पुरावा नसताना पतीवर चारित्र्यहीनतेचा आरोप करणे चुकीचे आहे. ही कृती क्रूरतेमध्ये मोडते असे न्यायालयाने स्पष्ट करून पत्नीला दणका दिला. या निर्णयाविरुद्ध पत्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून त्यासाठी हा निर्णय १० आठवड्यांसाठी स्थगित ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयFamilyपरिवार