शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पती-पत्नी एसीबीच्या जाळ्यात, ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 13:30 IST

एका शिक्षकाला नियमित करण्यासाठी साडेसहा लाखांची मागणी करून ५० हजार रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने विद्यालयाच्या संचालकासह मुख्यधापिकेला रंगेहात पकडले.

ठळक मुद्देशिक्षकाकडून लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापिकेसह संचालकास अटकखापरखेडा येथे एसीबीची कारवाई साडेसहा लाखांची केली होती मागणी

नागपूर : शाळेतील शिक्षकाला हजेरी पटावर स्वाक्षरी करू न देता अतिरिक्त होण्याची भीती दाखवित ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या लाचखोर पती-पत्नीला तक्रारकर्त्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

करंभाड (ता.पारशिवनी) येथील तथागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शांतशीला भोजराज मेश्राम (४६) आणि त्यांचे पती, संस्थेचे सचिव भामराज दौलराव मेश्राम (५७) अशी दोघांची नावे आहेत. खापरखेडा येथे मंगळवारी सांयकाळी ही कारवाई करण्यात आली असून मध्यरात्री खापरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी बुधवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करीत एक दिवसाचा पीसीआर एसीबीने मिळविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पारशिवनी तालुक्यात करंभाड येथे तथागत विद्यालय आहे. ही शाळा संचालित करणाऱ्या संस्थेचे सचिव भामराज दौलतराव मेश्राम हे कोराडी येथील एका शाळेत शिक्षकही आहेत. त्यांची पत्नी शांतशीला भामराज मेश्राम या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. तक्रारदार शिक्षक हा शिक्षक पदावर तथागत विद्यालय येथे कार्यरत आहेत.

तक्रारदार यांना आरोपी हे शाळेतील हजेरी पटावर स्वाक्षरी करू देत नव्हते. जानेवारी महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. जानेवारी महिन्यापासूनच ही शाळा ४० टक्के शासकीय अनुदानावर आली. मात्र, गैरहजेरी लावल्याने तक्रारदार अतिरिक्त व अनियमित ठरणार होता. तो अतिरिक्त व अनियमित ठरू नये यासाठी आरोपींनी तक्रारदाराला ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र २० हजार रुपये महिन्याच्या वेतनात ५० हजाराचा हप्ता मुख्याध्यापिका व संस्था सचिवास देणे शिक्षकाला शक्य नव्हते. यामुळे संबंधित शिक्षकाने याबाबत सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

याबाबत एसीबीच्या पथकाने मंगळवारी पडताळणी केली. यानंतर सापळा रचून उपरोक्त कारवाई करण्यात आली. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी मुख्याध्यापिका शांतशीला भामराज मेश्राम व संस्था सचिव भामराज दौलतराव मेश्राम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करून अटक केली आहे. ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलीस हवालदार सुनील कळंबे, नायक पोलीस शिपाई सारंग बालपांडे, सुशील यादव, महिला नायक पोलिस शिपाई बबिता कोकडे, गीता चौधरी, करुणा सहारे, वाहनचालक अमोल भक्ते यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणTeacherशिक्षकjobनोकरीEducation Sectorशिक्षण क्षेत्र