शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन नियम आल्याने जिल्ह्यात शेकडो जन्मदाखले रखडले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:23 IST

Nagpur : असा आहे नवीन नियम, काय कारण ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बोगस प्रमाणपत्रे रोखण्यासाठी १२ मार्चपासून राज्य सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियमात बदल केला आहेत. शासनाने स्पष्ट केले की, ज्या जन्म किंवा मृत्यूच्या नोंदी एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी प्रलंबित आहेत, त्यांची नोंदणी आता जिल्हा दंडाधिकारी, विभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या अधिकृत परवानगीशिवाय होणार नाही. नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर अशा प्रकारची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्यानंतर नव्याने प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत केवळ ४१ जणांना नवीन प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेले आहे. शेकडो जन्मदाखले रखडले आहेत. 

सहा महिन्यांत किती प्रमाणपत्रे रद्दगेल्या सहा महिन्यांत नागपूर जिल्ह्यातील १८४१ जन्म-मृत्यूची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. त्यांना पुन्हा नव्याने नवीन नियमानुसार अर्ज करावा लागत आहे. नवीन नियमानुसार त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून प्रमाणपत्र दिले जात आहेत.

असा आहे नवीन नियम, काय कारण ?नवीन नियमानुसार ज्या जन्म किंवा मृत्यूच्या नोंदी एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी प्रलंबित आहेत, त्यांची नोंदणी आता जिल्हा दंडाधिकारी, विभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या अधिकृत परवानगीशिवाय होणार नाही. यामुळे अपूर्ण, बेकायदेशीर किंवा खोटी कागदपत्रे सादर करून नोंदणी करण्याच्या घटनांना आळा बसेल. संबंधित अधिकाऱ्यांनी पुराव्यांची काटेकोर तपासणी करूनच प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही वर्षांत काही परदेशी नागरिकांनी महाराष्ट्रात खोटी जन्म नोंदणी करून भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, शासनाने आता कोणत्याही व्यक्तीला जन्म-मृत्यू नोंदणी करताना त्यांच्या स्थायिक पत्त्याच्या योग्य पडताळणीसह आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक केले आहे.

विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले, नोकरीचा अर्ज भरता येईनाजन्माच्या दाखला नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशास अडचणी येत आहेत. नोकरीचे अर्जसुद्धा भरण्यास अडचणी येताहेत.

पुरावे, कागदपत्रांची जंत्रीजन्माच्या नोंदीसाठी : रुग्णालयाचा दाखला, लसीकरण नोंदी, शाळा प्रवेशाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा अन्य शासकीय ओळखपत्र रहिवासी पुरावे (वीज बिल, पाणीपट्टी, मालमत्तेची कागदपत्रे)

पडताळणी, शपथपत्राचा त्रास वेगळाचनवीन नियमानुसार विविध पुरावे कागदपत्रे सादर केल्यानंतरही विलंबाने अर्ज सादर करणाऱ्यांना शपथपत्र आणि त्यांची सादर केलेली माहितीची पडताळणी केली जाणार आहे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक किंवा पोलिस विभागाकडून चौकशी अहवालसुद्धा मागविण्यात येत आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे.

रुग्णालयातील जन्मनोंद प्रत्येकालाच मिळेल का ?रुग्णालयातील जन्माची नोंद मिळण्यास मुख्य अडचणी येत आहेत. प्रत्येकालाच ती सहजासहजी भेटत नाही.

टॅग्स :nagpurनागपूर