शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

सव्वानऊ लाखांचा ऐवज पळविणारा गजाआड

By admin | Updated: May 24, 2017 02:39 IST

प्रतापनगरातील एका महिलेचा सव्वा नऊ लाखांचा ऐवज पळवून नेणाऱ्या आॅटोचालकाच्या अवघ्या २४ तासात

गुन्हे शाखेची कामगिरी : चोरलेला ऐवज जप्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रतापनगरातील एका महिलेचा सव्वा नऊ लाखांचा ऐवज पळवून नेणाऱ्या आॅटोचालकाच्या अवघ्या २४ तासात मुसक्या बांधण्याची कामगिरी गुन्हे शाखेच्या पथकाने बजावली. रविवारी भरदुपारी १२.२० च्या सुमारास ही घटना घडली होती. प्रेरणा अमित पिसे (वय २८), त्यांची छोटी मुलगी दिवीशा आणि आई सुनीता देशमुख यांच्यासह १३ मे रोजी मुलताई (बैतूल) येथील आजीकडे लग्नाच्या निमित्ताने गेल्या होत्या. तेथून रविवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास त्या बसने नागपुरात आल्या. गणेश टेकडी मंदिर समोरच्या मध्य प्रदेश बसस्थानकासमोर उतरल्यानंतर त्यांनी घरी येण्यासाठी एक आॅटो ठरविला. आॅटोने त्या प्रतापनगरातील आपल्या आदर्श कॉलनीतील घरी आल्या. घरासमोर आॅटोतून उतरताना त्यांच्या आईने एक सुटकेस व एक छोटी बॅग खाली घेतली. तर, प्रेरणा यांनी आपल्या लहानग्या मुलीला कडेवर घेतले. आॅटोत दोन मोठ्या बॅग होत्या. त्या खाली उतरवायच्या असतानाच आरोपी आॅटोचालकाने आॅटो मागेपुढे करून तेथून धूम ठोकली. आॅटोचालकाने पळविलेल्या दोन बॅगपैकी एका बॅगमध्ये सोन्याच्या माळ, नेकलेस आणि अन्य दागिन्यांचा समावेश आहे. तर दुसरीत २५ हजारांचे कपडे असा एकूण सव्वा नऊ लाखांचा ऐवज होता. प्रेरणा यांनी प्रतापनगर ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवताच सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी गुन्हा दाखल करून लगेच आॅटोचालकाचा शोध सुरू केला. शहरातील अन्य पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेलाही त्याची माहिती दिली. आरोपीच्या मुसक्या बांधल्या या धाडसी चोरीची माहिती कळताच पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, गुन्हे शाखेचे (डिटेक्शन) उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव जाधव, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, एएसआय राजकुमार देशमुख, हवालदार सुनील चौधरी, अफसरखान पठाण, अमित पात्रे, राहुल इंगोले, नीलेश वाडेकर, श्रीकांत पटणे यांनी मोठ्या शिताफीने आरोपीचा पत्ता काढला. आरोपी सुनील सुदाम मेश्राम (वय ५०, रा. काशीनगर) हा शताब्दी चौकातील कुमार बंधू सभागृहासमोर राहत असल्याचे कळताच तेथे जाऊन त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याने चोरलेले सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ९ लाख २२ हजारांचा ऐवज तसेच एक लाख रुपये किमतीचा आॅटोही जप्त केला.