शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त : नागपूर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:01 IST

शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात मर्यादित जलसाठा आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा आहे. मर्यादित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी हॅन्डपंप दुरुस्ती व नवीन बोअरवलेची कामे हाती घेण्याचे निर्देश प्रशासनाने जलप्रदाय विभागाला दिले आहे. परंतु शहरातील शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रशासनाचे निर्देश कागदावरच आहेत. यामुळे दुरुस्तीच्या नावावर होणारा लाखो रुपयांचा खर्च जातो कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात मर्यादित जलसाठा आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा आहे. मर्यादित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी हॅन्डपंप दुरुस्ती व नवीन बोअरवलेची कामे हाती घेण्याचे निर्देश प्रशासनाने जलप्रदाय विभागाला दिले आहे. परंतु शहरातील शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रशासनाचे निर्देश कागदावरच आहेत. यामुळे दुरुस्तीच्या नावावर होणारा लाखो रुपयांचा खर्च जातो कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.शहरातील पाणीटंचाई विचारात घेता ‘लोकमत’ चमूने शहरातील विविध भागातील हॅन्डपंपची पाहणी केली असता प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आले. सदर येथील हॅन्डपंप मागील काही महिन्यापासून नादुरुस्त आहे. स्थानिक नागरिकांनी झोन कार्यालयाकडे यासंदर्भात तक्रार केली. परंतु त्यानंतरही हॅन्डपंप दुरुस्त केला नाही. पाहणी केली असता नादुरुस्त हॅन्डपंपकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आले.पारडी रोड परिसरात पाण्याची टंचाई आहे. असे असूनही येथील हॅन्डपंप अनेक महिन्यापासून नादुरूस्त आहे. नारा-नारी भागात पाण्याची टंचाई आहे. अनेक वस्त्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. या भागातील दोन हॅन्डपंप दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी सांगितले. एका हॅन्डपंप जवळ कचरा साचला आहे. नंदनवन रोडवरील हॅन्डपंप मागील काही महिन्यापासून नादुरुस्त आहे. दुरुस्तीसाठी झोन कार्यालयाकडे तक्रार केली परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. कळमना मार्केट परिसरातील अनेक वस्त्यात पाणीटंचाई आहे. या परिसरातील हॅन्डपंप बंद आहे. त्यामुळे नागरिकांना याचा उपयोग नाही. हॅन्डपंप दुरुस्त करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने विक्रे त्यांनी सांगितले. धंतोली भागातील हॅन्डपंपाजवळ कचरा साचला आहे. पंप नादुरुस्त असल्याने त्याचा वापर केला जात नाही.टीबी वॉर्ड चौकातील हा हातपंप गेल्या कित्येक महिन्यांपासून अशा खराब परिस्थितीत पडला आहे. त्याच्या आजूबाजूला कचरा साचण्यासोबतच तणकटही वाढले आहे. याचा उपयोग नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी