शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या दारातही जपली माणुसकी; गडचिरोलीच्या शिपायाने तिघांना दिले जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:44 IST

Gadchiroli : नियतीचा घाला कधी आणि कसा येईल हे सांगता येत नाही. गडचिरोली येथे शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले ४८ वर्षीय रमेश निसार सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर जाण्यासाठी घरून निघाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नियतीचा घाला कधी आणि कसा येईल हे सांगता येत नाही. गडचिरोली येथे शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले ४८ वर्षीय रमेश निसार सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर जाण्यासाठी घरून निघाले. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या रमेश यांच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार सुरू होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. उपचारादरम्यान त्यांचा मेंदू मृत (ब्रेनडेड) घोषित झाल्यानंतर, दुःखाच्या डोंगराखाली असलेल्या त्यांच्या पत्नीने आणि कुटुंबाने धैर्याने अवयवदानाचा निर्णय घेतला, ज्यामुळे तीन गरजू रुग्णांना नवे आयुष्य मिळाले.

१६ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर रमेश निसार यांना तातडीने गडचिरोली आणि त्यानंतर नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना अखेर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. मात्र, मेंदूतील अतिरक्तस्त्रावामुळे त्यांची प्रकृती सुधारू शकली नाही.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने सर्व निकष तपासून त्यांना 'ब्रेनडेड' घोषित केले. मेडिकलमधील अवयवदान समन्वयक डॉ. सुमित चाहाकार आणि श्याम पांजाला यांनी निसार कुटुंबाचे समुपदेशन केले. पतीच्या निधनाचे अतिव दुःख असतानाही, पत्नी मोसमी निसार यांनी खंबीर होत सामाजिक बांधिलकी जपली. त्यांनी रमेश यांचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यास लेखी संमती दिली.

या निर्णयाला त्यांचे भाऊ विजय निसार आणि वहिनी विशाखा ठाकरे यांनीही पाठिंबा दिला. 'झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर'चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांच्या मार्गदर्शनात समन्वयक दिनेश मंडपे यांनी अवयवदानाची पुढील प्रक्रिया पूर्ण केली.

असे झाले अवयवांचे वाटप

'झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर' (झेडटीसीसी) नागपूर समितीने राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार यकृत न्यू एरा हॉस्पिटल, नागपूर येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाला, पहिली किडनी मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ३९ वर्षीय महिलेला, तर दुसरी किडनी एस. एस. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील ३८ वर्षीय पुरुषाला दान करण्यात आली.

सन्मान कॉरिडॉर आणि श्रद्धांजली

अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. सोमा चाम, डॉ. प्रणाली गुरुकार, डॉ. निखील काकानी, डॉ. नेहा बोरकर आणि कर्मचारी वगार्ने 'सन्मान कॉरिडॉर' तयार करून रमेश निसार यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली.त्यांच्या या दातृत्वाचा सन्मान म्हणून झेडटीसीसी नागपूरमार्फत त्यांचे पार्थिव गडचिरोली येथे विनामूल्य रुग्णवाहिकेने पोहोचवण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Gadchiroli Peon's Organ Donation: Humanity Prevails Even in Death

Web Summary : Gadchiroli school peon Ramesh Nisar, declared brain dead after an accident, gave new life to three people through organ donation. His wife and family's courageous decision to donate his liver and kidneys offered hope to recipients in Nagpur hospitals.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली