शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मानवधर्म : ड्रीम ट्रस्टची मधुमेहग्रस्त मुलांच्या कुटुंबांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 20:06 IST

कोरोना संक्रमणाच्या या काळात ड्रीम ट्रस्ट या सामाजिक संस्थेने मानवधर्म जोपासत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ट्रस्टच्या वतीने लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मधुमेहग्रस्त मुलांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयाची मदत केली जात आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे जीवन सापडले आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणाच्या या काळात ड्रीम ट्रस्ट या सामाजिक संस्थेने मानवधर्म जोपासत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ट्रस्टच्या वतीने लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मधुमेहग्रस्त मुलांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयाची मदत केली जात आहे. अशा सुमारे ३०० कुटुंबांना हे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. ट्रस्टचे डॉ. शरद पेंडसे यांनी ही माहिती दिली.देशातील लॉकडाऊन अंशत: शिथिल होताच ट्रस्टकडे इन्सलिन घेण्यासाठी येणाऱ्या मधुमेहग्रस्त मुलांची संख्या वाढली. दरम्यान, ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी या मुलांच्या पालकांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यातून मधुमेहग्रस्त मुलांची कुटुंबे लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडली असल्याचे पुढे आले. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असणाऱ्यांची रोजची कमाई बंद झाली. काहीजण आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन खेळणी, कपडे व दैनंदिन गरजेच्या वस्तू विकत होते. काहीजण चहाटपरी, केसकर्तन इत्यादी छोटे व्यवसाय करीत होते. लॉकडाऊन काळात त्यांचा व्यवसाय बंद होता. त्यामुळे अर्थार्जनही बंद होते. परिणामी, त्यांना जीवन जगणे कठीण झाले. राज्य सरकारच्या वतीने गरजू नागरिकांना अन्नधान्य, किराणा व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. असे असले तरी या कुटुंबांना अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे, ही बाब लक्षात घेता ड्रीम ट्रस्टने मधुमेहग्रस्त मुलांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला व त्यावर तातडीने अंमलबजावणीही सुरू केली. या अर्थसाहाय्यामुळे संबंधित कुटुंबांना २-३ महिने समाधानाने जगता येईल व या काळात ते आर्थिक संकटातून बाहेर पडून जीवनाची गाडी रुळावर आणू शकतील, असा विश्वास डॉ. शरद पेंडसे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :diabetesमधुमेहnagpurनागपूर