शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मानव तस्करीचा पर्दाफाश : बिहारमधून महाराष्ट्रात आणली जात होती ३३ मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:06 IST

हावडा-मुंबई मेलद्वारे बिहार येथून महाराष्ट्रात आणल्या जात असलेल्या ३३ अल्पवयीन मुलांची बुधवारी सुटका करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारावर आरपीएफ व पोलिसांनी छत्तीसगड येथील राजनांदगाव रेल्वे स्टेशनवरून या मुलांची सुटका करून मानव तस्करीचा पर्दाफाश केला.

ठळक मुद्देराजनांदगाव येथे हावडा-मुंबई मेलमधून केली सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हावडा-मुंबई मेलद्वारे बिहार येथून महाराष्ट्रात आणल्या जात असलेल्या ३३ अल्पवयीन मुलांची बुधवारी सुटका करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारावर आरपीएफ व पोलिसांनी छत्तीसगड येथील राजनांदगाव रेल्वे स्टेशनवरून या मुलांची सुटका करून मानव तस्करीचा पर्दाफाश केला.ही सर्व मुले बिहार येथील भागलपूर जिल्ह्यातील तिरपैती गावातील आहेत. त्यांना हावडा ते मुंबई जात असलेल्या हावडा मेलच्या बोगी क्रमांक एस-५ आणि एस-७ मधून नंदूरबार जिल्ह्यात घेऊन जात होते. अ‍ॅड. स्मिता पांडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला. त्या रायपूर येथून राजनांदगावला जात होत्या. एका व्यक्तीसोबत इतक्या मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलांना पाहून त्यांना संशय आला. त्यांनी विचारपूस केली तेव्हा त्यांचा संशय आणखी बळावला. त्यांनी पोलिसांना सूचित केले. अशी सूचना मिळताच पोलीस कर्मचारी आणि रेल्वे पोलीस तातडीने राजनांदगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तेथील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर हावडा वरून मुंबईला जात असलेली हावडा-मेल रेल्वेगाडी थांबताच बोगी क्रमांक एस-५ व एस-७ मधील मुलांना खाली उतरवण्यात आले. यासोबतच इतर मुलांना घेऊन जात असलेल्यांना उतरवण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व मुले ७ ते १३ वर्ष वयोगटातील आहेत. मुलांसोबत पकडण्यात आलेल्या आरोपीचे म्हणणे आहे की, या सर्व मुलांना मदरस्यात घेऊन जात आहे. परंतु आरोपी कुठल्याही प्रकारचे दस्तावेज दाखवत नाही आहे. आरपीएफने सर्व मुलांना आपल्यासोबत नेले. मुलांची विचारपूस सुरू आहे.मानव तस्करीची शंकापोलीस अधिकारी यू.बी.एस. चौहान यांचे म्हणणे आहे की, मानव तस्करीची शंका नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. तपासानंतरच प्रकरण नेमके काय आहे ते उघडकीस येईल. पकडण्यात आलेले सर्व लोक एकाच समुदायातील आहेत. ही बाब लक्षात ठेवूनही तपास केला जात आहे.

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करीrailwayरेल्वेBiharबिहारMaharashtraमहाराष्ट्र