शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अजनी रेल्वेस्थानकावर हावडा-मुंबई विशेष रेल्वेगाडी रुळावरून घसरली : दोन कोचला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:00 IST

अजनी रेल्वेस्थानकावर सकाळी ७.३० वाजता अजनी कॅबिन आणि आरआरआय दरम्यान ०२८६० हावडा-मुंबई विशेष रेल्वेगाडीचा अपघात होऊन कोच रुळाखाली उतरून पेट्रीकारला आग लागली. या घटनेत स्लिपर क्लास कोचला आग लागल्याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका, रेल्वेचे अ‍ॅक्सिडेन्ट रिलीफ ट्रेन आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ही मॉकड्रील असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ठळक मुद्देमॉकड्रीलच्या घटनेमुळे उडाली खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनी रेल्वेस्थानकावर सकाळी ७.३० वाजता अजनी कॅबिन आणि आरआरआय दरम्यान ०२८६० हावडा-मुंबई विशेष रेल्वेगाडीचा अपघात होऊन कोच रुळाखाली उतरून पेट्रीकारला आग लागली. या घटनेत स्लिपर क्लास कोचला आग लागल्याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका, रेल्वेचे अ‍ॅक्सिडेन्ट रिलीफ ट्रेन आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ही मॉकड्रील असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.रेल्वेगाडी क्रमांक ०२८६० हावडा-मुंबई विशेष रेल्वेगाडी अजनी रेल्वेस्थानकावर रुळाखाली घसरून या गाडीच्या स्लिपरक्लास कोचला आग लागली आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी इंजिनपासून १३ व्या क्रमांकाचा कोच रुळाखाली घसरल्याचे निदर्शनास आले. यात पेट्रीकार कोच आणि स्लिपरक्लास कोचला आग लागल्याचे आढळले. यात अखिल मंडल या प्रवाशाचा मृत्यू होऊन इतर सहा प्रवासी गंभीर जखमी झाल्यामुळे दोन रुग्णांना मेडिकलमध्ये तीन रुग्णांना रेल्वे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी अ‍ॅक्सिडेन्ट रिलीफ ट्रेन बोलाविण्यात आली. वैद्यकीय मदतीसाठी रेल्वेचे डॉक्टर, नर्स, रेल्वे कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. नियंत्रण कक्षाने रेल्वे अधिकारी आणि कर्मचाºयांना सूचना दिली. अजनीच्या स्टेशन व्यवस्थापकांनी अग्निशमन दलास सूचना दिली. सोबतच रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलीस, डॉक्टरला कळविण्यात आले. वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी ए. बी. दाभाडे यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला तसेच डिफेन्सला सूचना दिली. काही वेळानंतर ही मॉकड्रील असल्याची माहिती कळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अपघातासारख्या घटना घडू नयेत, घटना घडल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये तत्परता असावी यासाठी या मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज तिवारी, एन. के. भंडारी, मुख्य आरोग्य अधीक्षक डॉ. व्ही. के. आसुदानी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता रामबाबू, सहायक सुरक्षा आयुक्त दीपकसिंह चौहान आदी उपस्थित होते. मॉकड्रीलमुळे विभागातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी तत्पर असल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :railwayरेल्वेfireआग