शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

भूमिहीन आदिवासींचे कसे होणार सबलीकरण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:06 IST

भूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभिमान व सबलीकरण योजना शासनाने लागू केली होती. आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना २ एकर बागायती अथवा ४ एकर जिरायती शेती खरेदी करून देण्यात येत होती. या योजनेसाठी विभागाला शेतीच उपलब्ध होत नसल्याने काही प्रकल्प कार्यालयाने ही योजना बंद केली आहे तर काही प्रकल्पात योजनेसाठी तरतूद केल्यानंतरही जमीनच उपलब्ध होत नसल्याने निधी इतर योजनेवर खर्च करावा लागत आहे.

ठळक मुद्देविभागाला जमीन विकण्यास कुणीच तयार नाही : अनेक प्रकल्पात योजना बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभिमान व सबलीकरण योजना शासनाने लागू केली होती. आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना २ एकर बागायती अथवा ४ एकर जिरायती शेती खरेदी करून देण्यात येत होती. या योजनेसाठी विभागाला शेतीच उपलब्ध होत नसल्याने काही प्रकल्प कार्यालयाने ही योजना बंद केली आहे तर काही प्रकल्पात योजनेसाठी तरतूद केल्यानंतरही जमीनच उपलब्ध होत नसल्याने निधी इतर योजनेवर खर्च करावा लागत आहे.२०१८-१९ या वर्षासाठी नागपूर प्रकल्प कार्यालयाने १ कोटी व वर्धा प्रकल्प कार्यालयाने १.५५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. अ.भा. आदिवासी युवा परिषदेचे विदर्भ उपाध्यक्ष स्वप्निल मसराम यांनी यासंदर्भात मिळविलेल्या माहितीच्या अधिकारात हा निधी खर्चच झाला नसल्याचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी विभागाकडे काही प्रस्ताव शेतकऱ्यांनी दिले आहे. या योजनेसंदर्भात विभागातर्फे जनजागृती करण्यात आली नसल्यामुळे लाभार्थ्यांना त्याचा लाभ झाला नाही, अशी त्यांची ओरड आहे. पण यासंदर्भात नागपूरचे प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, योजनेसाठी जमीनच उपलब्ध होत नाही. योजनेंतर्गत शासकीय दरावर आदिवासी विभाग शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करतो. वर्धा जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबाशी जमिनीचा व्यवहार झाला होता. परंतु ऐनवेळी त्यांनी जमिनीची विक्री करण्यास नकार दिला. त्यामुळे जमीन उपलब्ध होऊ शकली नाही. पण त्यासाठी तरतूद केलेला निधी वाया गेला नाही, त्याचा इतर योजनेवर खर्च करण्यात आला आहे.काय होती योजनाभूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजुरी करणाºया दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना शासनाचे दराप्रमाणे २ एकर बागायत अथवा ४ एकर जिरायत शेतजमीन खरेदी करून देण्यात येते. यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. समितीमध्ये शेतजमिनीचे दर , लाभार्थी निवड , मूल्यांकन इत्यादीबाबत निर्णय घेण्यात येतो. शेतजमीन खरेदीसाठी लाभार्थ्यास ५० टक्के शासन अनुदान व ५० टक्के कर्ज स्वरुपात अनुदान देण्यात येते. देण्यात आलेल्या कर्जाचे १० वर्षपर्यंत परत फेडीचे हप्ते ठरविण्यात येतात. कर्जाची फेड खरेदी केल्यानंतर २ वर्षानंतर करण्यात येते व सदर कर्ज बिनव्याजी असते.जमीनच उपलब्ध होत नाहीया योजनेसाठी विभागाला ज्या दरावर जमीन खरेदी करायची आहे. तो शासकीय दर शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे जमीन उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही प्रकल्पांनी ही योजनाच बंद केली आहे.

 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाVidarbhaविदर्भ