शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नाटकच नाही तर नाटकवाले कसे जगतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 11:31 IST

नाटकाच्या ओढीने नाटकवाले तयार होत असतात आणि नाटकच होणार नसेल तर नाटकवाले जगतील कसे, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनाट्य क्षेत्रासाठी हव्यात उपाययोजनानाट्य परिषद, अ‍ॅक्टिव्ह रंगकर्मींनी घ्यावा सांघिक पुढाकार

प्रवीण खापरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठल्याही संकटाचे दोन पैलू असतात. एक तात्काळ निर्माण होणारी अराजकता आणि दुसरी त्या अराजकतेतून भविष्यवेधी साधावयाची संधी. संकटातून समस्या सोडविण्याचे खंबीर असे उपायही सापडत असतात. ही निरंतर प्रक्रिया आहे. याच प्रक्रियेचा लाभ नाटकवाल्यांनी विशेषत: हौशी नाटकवाल्यांनी घेणे गरजेचे आहे. कारण, कोरोनाच्या महामारीने इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा जास्त प्रहार सांस्कृतिक क्षेत्रावर, विशेषत: नाट्य क्षेत्रावर झाला आहे. नाटकाच्या ओढीने नाटकवाले तयार होत असतात आणि नाटकच होणार नसेल तर नाटकवाले जगतील कसे, हा प्रश्न आता निर्माण झाले आहे.कोरोनाचे संकट संपले नसले तरी तब्बल अडीच महिन्याच्या टाळेबंदीनंतर देण्यात आलेल्या शिथिलतेने जनजीवन पूर्वपदावर यायला लागले आहे. मनोरंजन, प्रबोधनाचा भाग असलेल्या नाट्य क्षेत्राकडे सामान्य माणूस ढुंकूनही बघणार नाही.मात्र, नाट्य क्षेत्राच्या रोजगारावर जगणारे बरेच आहेत आणि नाट्य क्षेत्र उघडणार नसेल तर त्यांची प्रचंड आबाळ होणार आहे. अशा स्थितीत स्वत:ला नाटकवाल्यांचे पालक म्हणवून घेणारी नाट्य परिषद व अ‍ॅक्टिव्ह रंगकर्मींनी हेवेदावे विसरत सांघिक पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नाट्य क्षेत्र पूर्वपदावर कसे येईल, नाटकांच्या तालमी कशा सुरू करता येतील आणि नाटकांच्या सादरीकरणासाठी काय करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे.

आम्हीही १०० रसिकांसोबत नाटक करू - नरेश गडेकरज्या प्रमाणे विवाह, मुंज आदी सोहळ्यांना ५० वºहाड्यांची परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे शासनाने नाटक सादर करण्यासाठी ५०-१०० रसिकांची परवानगी दिली तर नाटक सुरू होईल आणि रंगभूमीवर आलेली मरगळ दूर होईल. शिवाय, कोरोनाच्या धास्तीमुळे निर्माण झालेला निरुत्साह दूर करण्यासाठी जनसामान्यांमध्ये चैतन्य पसरेल. त्यासाठी शासनाने सभागृह खुले करावे. नाट्य रसिक सुज्ञ असल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वगैरे कोरोनाच्या ज्या मार्गदर्शिका आहेत त्यांचे पालन नक्कीच केले जाईल, अशी भावना अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.ओटीटी, ऑनलाईन हा पर्याय नाहीच!कोरोनामुळे बऱ्याच चित्रपटांचे प्रदर्शन चित्रपटगृहांअभावी होऊ शकले नाही आणि पुढचे काही महिने ते शक्यही नाही. त्यामुळे त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्याय शोधत चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातही नाट्य परिषदेची पुणे शाखा व कोथरूड येथील संवाद संस्थेने नाटकांचे आॅनलाईन प्रदर्शन करण्यासाठी नाट्यगृहे उघडी करण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे. मात्र, नाटक आॅनलाईन होणार असेल तर त्याला नाटक कसे म्हणावे? हा प्रश्न आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस