शहरं
Join us  
Trending Stories
1
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
2
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
3
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
4
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
5
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
6
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
7
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
8
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
9
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
10
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
11
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
12
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
13
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
14
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
15
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
16
स्मिता पाटील यांच्यासोबतच्या तुलनेवर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया, म्हणाली, "बाईला संघर्ष आजही..."
17
मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही राधिका आपटे? म्हणाली, "मला काही काळापासून..."
18
मुलाने कपाटातून आईचा महागडा नेकलेस चोरला, तोडून शाळेतील विद्यार्थिनींना वाटला, त्यानंतर...
19
IND vs SA T20I : संजूच्या जागी गिल का? सलामी संदर्भात कॅप्टन सूर्यानं स्पष्टीकरण दिलं, पण...
20
Jara Hatke: रात्री झोपताना एक पाय ब्लँकेटमधून बाहेर काढण्याची सवय आहे? मग 'हे' वाचाच!
Daily Top 2Weekly Top 5

संविधान कसे तयार झाले? संविधान सभेतील संपूर्ण चर्चा आता मराठीत

By आनंद डेकाटे | Updated: November 26, 2025 16:40 IST

Nagpur : नागपूरचे देविदास घोडेस्वार यांची महत्त्वपूर्ण कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अलीकडे कुणीही उठतो आणि संविधानाबाबत उठसूठ काहीही बरळत बसतो. परंतु संविधान काही सहजासहजी कुणाच्या मनात आले म्हणून काहीही कलम तयार झाले असे नाही. संविधान सभेत तेव्हा सर्वच दिग्गज मंडळी होती. प्रत्येक लहान-सहान बाबीवर प्रदीर्घ अशी चर्चा झाली. वादविवाद झाले. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने कुठे एका गोष्टीवर एकमत होऊन कलम तयार होत गेली. संविधान सभेतील ही सर्व चर्चा (Constituent Assembly Debates) ग्रंथरूपात आजही संसदेमध्ये उपलब्ध आहे. हे संपूर्ण खंड इंग्रजी भाषेत होते. नागपूरचे देविदास घोडेस्वार यांनी भारतीय संविधान निर्मितीतील ऐतिहासिक दस्तऐवज ‘संविधान सभेतील वादविवाद’ मराठी भाषेत उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे संविधान निर्मिती प्रक्रियेतील गुंतागुंती, चर्चा आणि विचारमंथन आता मराठी वाचकांपर्यंत सहजपणे पोहोचले आहे.

संविधानासारख्या मूलभूत ग्रंथाच्या निर्मितीच्या मागील प्रक्रिया, त्यातील वादविवाद, प्रस्ताव, हरकती आणि नेत्यांचे विवेकी मुद्दे सामान्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने घोडेस्वार यांनी ‘संविधान सभा डिबेट्स (मराठी)’ हे रूपांतर तयार केले. ९ डिसेंबर १९४६ ते २४ जानेवारी १९५० या काळात संविधान सभेत जे डिबेट्स झालेत ते सर्व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत. इंग्रजीचे एकूण ५ खंड आहेत. ते सर्व मराठीमध्ये अनुवाद करण्यात आले. मराठीत एकूण दहा खंड तयार झाले. २०१३ मध्ये पहिले ३ खंड प्रकाशित झाले. २०१४ मध्े दुसरे ३ खंड आणि २०१५ मध्य ४ खंड प्रकशित झाले. 

या पुस्तकातून संविधान कसे आकारास आले, कोणते मुद्दे चर्चेत होते, विविध सदस्यांची भूमिकांची तपशीलवार माहिती मराठीतून उपलब्ध झाली आहे. घोडेस्वार यांच्या या कार्याचे खास महत्त्व असे की संविधान निर्मिती ही अत्यंत जटिल व विचारप्रधान प्रक्रिया होती. त्यातील अनेक मुद्दे, मतभेद आणि निर्णयप्रक्रियेतील तपशील मराठी भाषिकांना सहजपणे समजावेत, यासाठी त्यांनी केलेले भाषांतर मोठे योगदान ठरते. 

संविधान सभेतील वादविवादांचे मराठीकरण उपलब्ध झाल्याने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मुलभूत मूल्यांविषयी जागरूकता वाढीस लागण्यास मदत होत आहे. घोडेस्वार यांचे प्रयत्न संविधानाचे तत्त्वज्ञान जनसामान्यांच्या भाषेत सहजपणे पोहोचवणारे ठरत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi translation unveils constitution's making, constituent assembly debates now accessible.

Web Summary : Devidas Ghodeswar translated the Constituent Assembly Debates into Marathi, making the constitution's complex creation process accessible. The translation of five English volumes into ten Marathi volumes reveals discussions and debates, promoting awareness of constitutional values like justice and equality.
टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनnagpurनागपूर